मुंबई - काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने केलेल्या कारवाईदरम्यान स्ट्रगलर कलाकारांकडून पॉर्न फिल्म शूट करून घेणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली होती. या संदर्भात बॉलिवूडमधल्या 'गंदि बात' या चित्रपटात काम केलेल्या गहना वशिष्ठ या महिला कलाकाराला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशीनंतर या संदर्भात उमेश कामत नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली असून, हा उमेश कामत एका मोठ्या उद्योजकाचा एकेकाळी पीए म्हणून काम करत होता.
हेही वाचा - बर्ड फ्ल्यू : राज्यातील सर्वात मोठे 'कलिंग' ऑपरेशन नंदूरबारमध्ये, ९ लाख कोंबड्या करणार नष्ट
अटक करण्यात आलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ हिच्याकडून आत्तापर्यंत 87 पॉर्न फिल्मचे शूटिंग करण्यात आले असून, शूटिंग केल्यानंतर सदरची पॉर्न फिल्म ट्रान्सफर वरून ती उमेश कामत याला पाठवत होती. परदेशातून या पॉर्न फिल्म कशा प्रदर्शित करायच्या याचा निर्णय उमेश कामत घेत असल्याचेही सांगितले जात आहे. या बरोबरच गहना वशिष्ठ हिने तिच्या एकूण वेबसाईटवरसुद्धा या पॉर्न फिल्म अपलोड केल्या होत्या. या पॉर्न फिल्म पाहण्यासाठी सदरच्या व्यक्तींना 2 हजार रुपये देऊन सभासद व्हावे लागत होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.