मुंबई - राज्यात विशेषतः मुंबईत सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. गणेशोत्सवा दरम्यान आपल्या लाडक्या गणरायाला अधिक आकर्षक आणि देखणे रूप यावे, यासाठी सार्वजनिक मंडळाकडून जोरदार आरास आणि सजावट केली जाते. काही गणेशोत्सव मंडळ तर केवळ फुलांच्या सजावटीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र गणेशोत्सव मंडळातील फुलांच्या सजावटीपेक्षा काहीशी वरचढ ठरणारी सजावट, आज मंत्रालयात चौथ्या माळ्यावर पाहायला मिळाली. निमित्त होते ते, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील Gulabrao Patil यांच्या मंत्रालयातील कार्यालयाच्या प्रवेशाचे. entry into the office very much discussed
झेंडूच्या माळांनी कॉरिडॉर सजला मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर माजी मंत्री नितीन राऊत यांची अतिशय देखणी केबिन आणि त्यांचे दालन आता, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना मिळाली आहे. कॉर्पोरेट जगताला लाजवेल अशा पद्धतीची असलेली ही केबिन अतिशय चकचकीत आणि आकर्षक आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त उठावदार आज फुलांची आरास दिसत होती.
फुलबाजी चांगलीच चर्चेत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरील कॉरिडोर झेंडूच्या माळांनी सजवण्यात आला होता. तर त्यांच्या दालनातील टेबलावर फुलांची सुंदर आरास करण्यात आली होती. त्यांच्या खुर्ची मागे सुद्धा फुलांची व गुलाब पुष्पांची सुंदर आरास करण्यात आली होती. गुलाबरावांच्या मंत्रालय प्रवेशाची ही आरास इतकी देखणी होती की, या त्यापुढे अन्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनाचा ताबा केव्हा घेतला, हे लक्षातही आले नाही. अगदी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयीन प्रवेशावेळी सुद्धा, एवढी आरास आणि सजावट दिसली नाही. त्यामुळे गुलाबरावांच्या कार्यालय प्रवेशाची ही फुलबाजी चांगलीच चर्चेत राहिली.