ETV Bharat / city

Uddhav Thackeray Meet Chandrabhaga Shinde : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह घेतली 'फायर आज्जीची' भेट - उद्धव ठाकरे आजी भेट

शिवसेनेच्या रणरागिणी फायर आज्जी ( Mumbai Shivsainik Aaji ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 80 वर्षाच्या चंद्रभागा शिंदे ( Chandrabhaga Shinde ) यांना भेटण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) आपल्या कुटुंबासह परळ येथील दाभोळकर वाडी येथे आले होते.

Uddhav Thackeray Meet Chandrabhaga Shinde

author img

By

Published : Apr 24, 2022, 8:06 PM IST

Updated : Apr 25, 2022, 9:18 AM IST

मुंबई - शिवसेनेच्या रणरागिणी फायर आज्जी ( Mumbai Shivsainik Aaji ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 80 वर्षाच्या चंद्रभागा शिंदे ( Chandrabhaga Shinde ) यांना भेटण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) आपल्या कुटुंबासह परळ येथील दाभोळकर वाडी येथे आले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फायर आजीसाठी हापूस आंब्याच्या चार पेट्या आणलेल्या होत्या. यावेळी आदित्य ठाकरे आणि तेजस यांनी आज्जीचा आशीर्वाद घेतला. यासोबतच ठाकरे कुटुंबीय आणि चंद्रभागा शिंदे यांच्यासोबत फोटो काढला.

आज्जीसाठी हापूस आंब्याच्या चार पेट्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावी, अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी दिला होता. त्यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येनं मातोश्रीबाहेर जमले. यामध्ये ८० वर्षांच्या चंद्रभागा शिंदे या आजींनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. म्हातारपणात सुद्धा तरुणाला लाजवेल असा एकनिष्ठ शिवसैनिक चंद्रभागा शिंदे यांची आक्रमक भूमिका बघून, स्वता मुख्यमंत्री ठाकरेंनी आज संध्याकाळी या आजींची भेट घेतली. आजींच्या भेटीसाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब परळच्या त्यांच्या घरी गेले होते. आजसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हापूस आंब्याचे चार पेट्या घेऊन गेले होते. याशिवाय आज्जीचा भेटीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आजीचे चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी सुद्धा आजीबरोबर फोटो काढून, त्यांच्या आशीर्वाद घेतला.

मुख्यमंत्र्यांनी आजीला दिलेले निमंत्रण - 80 वर्षाच्या चंद्रभागा शिंदे आजी सारखे शिवसैनिक माझ्याबरोबर असल्याने मला मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. 'माणसाचं वय कितीही वाढले, तरी तो मनाने तरुण हवा, असे बाळासाहेब म्हणायचे. या आजी अजूनही तरुण आहेत. वय वाढले आहे. पण त्या अजूनही युवासेनेच्याच कार्यकर्त्या आहेत. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज इतके कौतुक केले आहे. मातोश्रीवर येऊन गेलात, आता वर्षावर सहकुटुंब या, असं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांना दिली आहेत. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रभागा शिंदे यांच्या कुटुंबियांना सुद्धा आजीच्या आरोग्याची काळजी घ्या, असं सुद्धा सांगितले आहे.

हेही वाचा - PM Narendra Modi Uncut : पंतप्रधान मोदींनी स्वीकारला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार', पाहा संपूर्ण भाषण

Last Updated : Apr 25, 2022, 9:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.