मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांचा आज ६२ वाढदिवस आहे. कोरोनानंतर उद्धव ठाकरे यांचा पहिल्यांदाच वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. हिंदुदृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अस्तिर झालेल्या शिवसेनेची खंबीरपणे जबाबदारी पेलली. २०१९ मध्ये भाजपशी फारकत घेतल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या समोर निडरपणे अडीच वर्षे राज्य चालवले. अखेर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी आमदार, खासदारांनासोबत घेऊन बंड करत शिवसेनेला विशेषतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हादरा दिला. त्यामुळे शिवसेना नव्याने पुन्हा उभी करण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्या समोर असणार आहे.
समृद्ध वारसा लाभला - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आजोबा प्रबोधनकार ठाकरे ( Prabodhankar Thackeray ), शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे ( Mother Meenatai Thackeray ) यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. उद्धव ठाकरे यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमधून फोटोग्राफरचे धडे गिरवले. त्यांची छायाचित्रणाची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची मुख्य संपादक ( Editor in Chief of Dainik Samana ) म्हणून जबाबदारी सांभाळली.
राज्यात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट केली - २००२ मध्ये राजकारणाची सूत्रे त्यांनी हाती घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला विजय मिळवून दिला. २००३ मध्ये शिवसेनेचे कार्याध्यक्ष पद त्यांच्याकडे सोपवण्यात आले. २००४ मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि उत्तर अधिकार जाहीर केले. मुळात उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थी दशेपासून झाली. राजकारणात आल्यापासून त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यापासून राज ठाकरेपर्यंत अनेकांनी शिवसेना सोडली. शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी हाती घेत, राज्यात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट केली.
महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री - शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांच्या कार्यकाळात अनेक आव्हाने त्यांच्यासमोर उभी राहिली. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री ( CM of MahaVikas Aghadi Government ) म्हणून उद्धव ठाकरेंनी नव रूप राज्यातील जनतेला पाहायला मिळाले. कोरोना काळात केलेली कामगिरी देशपातळीवर लक्षवेधी ठरली. विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत काम करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून संवेदनशील, कालासक्त राजकारणी म्हणून ओळख निर्माण केली.
शिंदेंच्या बंडखोरीमुळे मोठा धक्का - शिंदेंच्या बंडखोरीचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. विश्वासू असलेल्या शिंदेंच्या बंडखोरीने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. यावेळी काँग्रेस - राष्ट्रवादीकडून त्यांना मोलाची साथ मिळाली. सध्या एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर आमदार, खासदार, आजी - माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. दुसरीकडे शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात गेला आहे. नव्याने पक्ष बांधणी करण्याचे आव्हान उद्धव ठाकरे समोर असणार आहे.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव - वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून उद्धव ठाकरेंवर पुष्पगुच्छ, पुष्पहार, शाली, फोटो फ्रेम्स स्वरूपात शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. यंदा शिंदे यांच्या बंडामुळे शिवसैनिकांनी भेटावे, असे सांगत पुष्पहार वगैरे घेऊन येऊ नका असे आवाहन केले आहे. तसेच शिंदे गटाच्या बंडामुळे कायदेशीर पेच निर्माण झाल्याने प्रतिज्ञापत्र घेऊन येण्याची विनंती उद्धव ठाकरे यांनी केली होती. आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मातोश्रीवर दाखल होत आहेत.
शिवसेनेचा विस्तारावर महत्त्वपूर्ण भूमिका - आजवर शिवसेनेचा विस्तार करण्यात उद्धव ठाकरे आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कोणतीही निवडणूक न लढवता राज्याचे मुख्यमंत्री होण्याच्या मान उद्धव ठाकरे यांना मिळाला. राज्यात अशापद्धतीने मुख्यमंत्री झालेले पहिले नेते आहेत. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर १८ मे २०२० रोजी उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ असा त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ राहिला.
हेही वाचा - उमेश कोल्हे खूनातील आरोपीला आर्थर रोड कारागृहात मारहाण