ETV Bharat / city

Uddhav Thackeray : 'मतभेद ठेवू नका निवडणुकीच्या तयारीला लागा', उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन - शिवसैनिक

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. यासाठी आज नाशिकच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. दरम्यान आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Election) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'मतभेद ठेवू नका निवडणुकीच्या तयारीला लागा' (dont keep differences start preparing for elections) असे आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना (Uddhav Thackeray appeal to Shivsainik) केले आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
author img

By

Published : Sep 23, 2022, 6:30 PM IST

मुंबई : दादरच्या शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा होणार? याचा वाद अद्याप काही म्हटलेलं नाही. आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Election) निवडणुकांच्या (dont keep differences start preparing for elections) पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. कारण, याच दसरा मेळाव्यातील भाषणामुळे महाराष्ट्राच्या आणि एकूणच शिवसेनेच्या पुढच्या वाटचालीची दिशा जाहीर होईल. त्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरातून अनेक शिवसैनिक मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा जाहीर करत आहेत. आज नाशिकच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray appeal to Shivsainik) यांची भेट घेतली व त्यांना आपला पाठिंबा दर्शवला.

कामाला लागा : या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'आपल्याकडे उत्साह अमाप आहे. पण एकजूट सुद्धा तशी ठेवायची आहे. लक्षात ठेवा आता प्रत्येक महानगरपालिका जिंकायचीच आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवायचाच आहे. निवडणुका आल्यावर रुसवा फुगवा, गट तट अजिबात करू नका. मतभेद ठेवू नका. उमेदवारी फार मोजक्याच लोकांना देता येते. त्यामुळे आता निवडणुकीच्या तयारीला लागा.' असं उद्धव ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर येथील शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

शिवसैनिकांशी संवाद साधतांना उद्धव ठाकरें

ठाकरे पूर्ण ताकदीने मैदानात? : उद्धव ठाकरे यांनी थेट अमित शहा यांना आव्हान दिल्याने, उद्धव ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरल्याचे आता स्पष्ट आहे. गोरेगाव येथे झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हणाले होते की, 'हिंमत असेल तर महिनाभरात BMC निवडणूक घेऊन दाखवा. मुंबईतील प्रत्येक समाज आमच्यासोबत आहे. गुजराती पण आमच्यासोबत. हिंदू, मुस्लिम, दलित हे देखील माझ्यासोबत आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर एका महिन्यात येथे बीएमसी आणि विधानसभा निवडणुका दाखवा.'

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या थेट आव्हान नंतर त्यांच्या भेटीसाठी महाराष्ट्रभरातून त्यांना भेटायला येणाऱ्या नेत्यांचा ओघ वाढला आहे. नाशिकच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व त्यांना आपला बिनिश्वर्त पाठिंबा जाहीर केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.