ETV Bharat / city

सोबत राहिलेल्या आमदारांना उद्धव ठाकरेचं भावनिक पत्र ! - उद्धव ठाकरे

कोणत्याही धमक्या ( Threats ) वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत ( Shiv Sena ) राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला ( Maharashtra ) अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले.

उद्धव ठाकरेचं भावनिक पत्र
उद्धव ठाकरेचं भावनिक पत्र
author img

By

Published : Jul 11, 2022, 11:55 AM IST

मुंबई - राज्यात असलेले महाविकास आघाडी सरकार शिवसेनेमध्ये ( Shiv Sena ) झालेल्या बंडानंतर पाय- उतार झाले आहेत. शिवसेनेच्या 40 आमदारांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात बंड केल्याने उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना मुख्यमंत्री ( CM ) पदावरून पाय- उतार व्हावे लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारला. भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने एकनाथ शिंदे यांनी आपले सरकारही स्थापन केले आहे. मात्र, ही सर्व उलथापालथ होत असतानाही सोबत असलेल्या 15 आमदारांनी न डगमगता उद्धव ठाकरे यांची साथ दिली आहे. या 15 आमदारांना उद्धव ठाकरे यांनी भावनिक पत्र लिहिले आहे. या 15 निष्ठावान आमदारांनी आपल्याला साथ दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहे.

आपल्या पत्रात उद्धव ठाकरे म्हणतात..- "आईच्या दुधाशी कधीही बेइमानी करू नका. हा बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत निष्ठावान राहिलात. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिलेत. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना" असल्याचे आपल्या पत्रातून उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. "शिवसेना हा एक विचार आहे. बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहेत. निष्ठा आणि अस्मितेची महती आपल्याला बाळासाहेबांनी शिकवली. शिवसेनेचे आमदार म्हणून, तुम्ही केलेले निष्ठेचे पालन यातून बाळासाहेबांच्या विचारांचे तुम्ही पाईक आहात", हे दाखवून दिले असल्याचे पत्रातून उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर भलेमोठे पोस्टर लावले - शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, तसेच शिवसेनेतील आमदारांनी बंड पुकारल्यानंतर ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. मात्र, काल दिवसभरात संयम न सुटलेल्या शिवसैनिकांचा एकनाथ शिंदे आता परतणार नाही, हे जवळपास निश्चित झाल्यानंतर संयम सुटू लागला आहे. शिवसेनेचा भांडुपच्या नगरसेविका दीपमाला बडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर भलेमोठे पोस्टर लावले आहे.

तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है - पोस्टरच्या माध्यमातून बडे यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला असून, तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है, अशा शब्दात आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. याच पद्धतीने आता शहरात विविध ठिकाणी शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू होण्याची शक्यता असून त्यांच्याविरोधात प्रदर्शनही शिवसैनिकांकडून केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - Shiv Sena Vs Eknath Shinde: 'देशात लोकशाही आहे की नाही? की त्याची हत्या झाली निकाल येईल' आजच्या सुनावणीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.