ETV Bharat / city

Saamana Editor in Chief : उद्धव ठाकरे पुन्हा दैनिक सामनाचे मुख्य संपादक

author img

By

Published : Aug 5, 2022, 2:55 PM IST

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ( Uddhav Thackeray ) झाल्यानंतर वृत्तपत्राच्या संपादक पदावर त्यांना कायदेशीर रित्या राहता येणार नव्हते, अशा परिस्थितीत सामना वृत्तपत्राची संपादक ( Editor Saamana Uddhav Thackeray ) पदाची धुरा कोण सांभाळणार? असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता. तसेच बिगर ठाकरे म्हणून कोणालाही सामना वृत्तपत्राचे संपादक करता येणार नव्हते. त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्याकडे संपादक पदाची धुरा देण्यात आली होती.

Saamana Editor in Chief
Saamana Editor in Chief

मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'सामना' वृत्तपत्राची संपादक म्हणून धुरा सांभाळली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सामना वृत्तपत्राचे संपादक म्हणून जबाबदारी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे दिली होती. मात्र आजपासून पुन्हा एकदा सामनाचे संपादक म्हणून धुरा सांभाळली असून आजच्या 'सामना' वृत्तपत्र संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ( Uddhav Thackeray ) झाल्यानंतर वृत्तपत्राच्या संपादक पदावर त्यांना कायदेशीर रित्या राहता येणार नव्हते, अशा परिस्थितीत सामना वृत्तपत्राची संपादक ( Editor Saamana Uddhav Thackeray ) पदाची धुरा कोण सांभाळणार? असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता. तसेच बिगर ठाकरे म्हणून कोणालाही सामना वृत्तपत्राचे संपादक करता येणार नव्हते. त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्याकडे संपादक पदाची धुरा देण्यात आली होती. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद राहिलेले नाही. त्यामुळे संपादकपदाची धुरा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहेत.

सामना वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादक पदी संजय राऊत म्हणून अद्यापही कार्यरत आहे. संजय राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणात ईडी कोठडीत आहेत. सामना वृत्तपत्राच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर सातत्याने संजय राऊत यांनी हल्ला चढवला होता. मात्र त्यांना अटक झाल्यानंतर देखील सामनामधून केंद्र सरकारवर सुरू असणाऱ्या ठाकरी भाषेतील हल्ला कमी झालेला नाही.

हेही वाचा - Sanjay Raut family : शरद पवार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार, सूत्रांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.