ETV Bharat / city

Uday Samant on Vedant foxconns वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गेलेला नाही, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा - उदय सामंत वेदांता फॉक्सकॉन

राज्यातील वेदांता फॉक्सकॉन कंपनीच्यावतीने प्रस्तावित एक लाख 54 हजार कोटी रुपयांचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प गुजरातला पळवल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदे आणि फडणवीस सरकारने ( Shinde gov on Vedanta project ) हा प्रकल्प गुजरातला बहाल केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Uday Samant
Uday Samant
author img

By

Published : Sep 15, 2022, 8:31 PM IST

Updated : Sep 15, 2022, 10:03 PM IST

मुंबई वेदांत आणि फॉक्स कॉन कंपनीचा प्रस्तावित प्रकल्प गुजरातला गेल्याच्या पार्श्वभूमीवर ( Uday Samant on Vedant foxconns ) गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात रणकंदन सुरू आहे. मात्र असे असले तरी वेदांता प्रकल्प हा दोन टप्प्यात होणारा प्रकल्प आहे त्यातील काही भाग हा महाराष्ट्रात होणारच आहे, असा दावा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ईटीव्ही ( Uday Samant Etv Bharat interview ) भारतशी बोलताना केला.

राज्यातील वेदांता फॉक्सकॉन कंपनीच्यावतीने प्रस्तावित एक लाख 54 हजार कोटी रुपयांचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प गुजरातला पळवल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदे आणि फडणवीस सरकारने ( Shinde gov on Vedanta project ) हा प्रकल्प गुजरातला बहाल केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर वेदांता कंपनीला योग्य प्रतिसाद न दिल्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेला कंटाळून हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा प्रति दावा शिंदे फडणवीस सरकारने केला होता. मात्र या प्रकल्पाच्या संदर्भात प्रचंड गदारोळ झाल्यानंतर अखेर वेदांताचा प्रकल्प राज्याबाहेर गेलाच नाही. त्यातील काही भाग अजूनही राज्यात होणार असल्याचे वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी ट्विटद्वारे जाहीर केल्याचा दावा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे.

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गेलेला नाही

वेदांता दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात वेदांताचा सेमीकंडक्टर चा प्रोजेक्ट जरी सध्या महाराष्ट्रात प्रस्तावित नसला तरी या प्रकल्पाचा दुसरा टप्पा मात्र महाराष्ट्रातच होणार आहे. या प्रकल्पाची निगडित अन्य उत्पादने ही महाराष्ट्रातच घेण्यात येतील असा दावा करत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

शरद पवार मोठे नेते, मात्र प्रकल्प येणारच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा पवार यांनी एकदा राज्यातून गेलेला प्रकल्प पुन्हा येत नाही हिंमत असेल तर सरकारने हा प्रकल्प पुन्हा आणून दाखवावा जनतेची दिशाभूल करू नये असा हल्लाबोल सरकारवर केला आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या अनास्थेमुळेच प्रकल्प गेल्याची टीका पवार यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर विचारले असता, उदय सामंत म्हणाले की, शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलू इच्छित नाही परंतु महाराष्ट्रामध्ये उद्योग येणार आणि लोकांना रोजगार मिळणार यात कोणतीही शंका नाही. महाराष्ट्र उद्योगाच्या बाबतीत अग्रेसर राहील यासाठीच आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि यापुढेही प्रयत्न करत राहणार आहोत. असा दावाही त्यांनी केला.

महाराष्ट्रात रोजगार निर्मिती करणार- महाराष्ट्रात उद्योग विभागाच्या मार्फत रोजगार निर्मिती करण्याचा आमचा उद्देश आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत आम्ही पूर्ण करणारच येत्या काळात राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून आम्ही उद्योग निर्मिती करत आहोत त्यामुळे कुणीही काळजी करण्याचे कारण नाही महाराष्ट्रात नक्कीच रोजगार निर्मिती होईल असा दावा त्यांनी केला.

वेदांताचा ट्विटद्वारे विश्वास वेदाता कंपनीने आज ट्विटद्वारे महाराष्ट्रात आगामी काळात प्रकल्प उभा करणार असल्याचे स्पष्ट केल्याने वेदांत हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असे आता कुणालाही म्हणता येणार नाही त्यामुळे या संदर्भातल्या सर्व चर्चा या आता निरर्थक ठरत आहेत विरोधकांनी कितीही आरोप केले तरी आता त्यात काहीही अर्थ नाही असेही उदय सामंत यावेळी म्हणाले.

Last Updated : Sep 15, 2022, 10:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.