ETV Bharat / city

मुंबईत चोरांचे मुंडन करून अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड

author img

By

Published : Jan 8, 2021, 9:36 AM IST

मोबाईल चोरांचे मुंडन करून अर्धनग्न अवस्थेत धिंड काढल्याची घटना मुंबईतील कांदिवली परिसरात घडली. दोन चोरांची गल्लीतून वाजतगाजत धिंड काढून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चोरांची काढली धिंड
चोरांची काढली धिंड

मुंबई - मोबाईल चोरांचे मुंडन करून अर्धनग्न अवस्थेत धिंड काढल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. दोन चोरांची गल्लीतून वाजतगाजत धिंड काढून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी ९ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाईल आणि पैशांची चोरी -

मुंबईत चोरांचे मुंडन करून अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड

कांदिवली परिसरात दोन चोरांनी एका घरातून मोबाईल आणि पैशाची चोरी केली होती. मात्र, त्यांना रंगेहात पकडण्यात आल्यानंतर स्थानिकांनी चांगलीच धुलाई केली. नागरिकांनी त्यांचे मुंडन करत अंगावरील कपडेही फाडले. तसेच अर्धनग्न अवस्थेत गळ्यात फुलांचे हार घालत त्यांची वाजतगाजत धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओ बघ्यांनी काढला होता. चोरांच्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. याची दखल कांदिवली पोलिसांनी घेतली आहे.

पाच जण अटकेत -

कांदिवली पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य पाहता सुमारे आठ ते नऊ जणांविरोधात भारतीय दंड संविधानाच्या कलम 365,307,324,506(2),143,145,147,149 नुसार गुन्हा दाखल केला. यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींना बोरिवली कोर्टात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयाने त्यांना ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.