ETV Bharat / city

High Speed Water Taxi : सोमवारपासून सर्वात मोठ्या हायस्पीड वॉटर टॅक्सीच्या दोन फेऱ्यांची होणार सुरुवात - हाय स्पीड वॉटर टॅक्सी

मुंबईमध्ये नुकतेच उदघाटन झालेल्या वॉटर टॅक्सीच्या ( Mumbai Water Taxi ) ताफ्यात उद्या (सोमवार) पासून हायस्पीड वॉटर टॅक्सी ( High Speed Water Taxi ) दाखल होणार आहे. या वॉटर टॅक्सीसाठी ऑनलाईन बुकिंग ( Water Taxi Online Booking ) उपलब्ध नसल्याने ऑफलाईन तिकीट काढावे लागत आहे.

हायस्पीड वॉटर टॅक्सी
हायस्पीड वॉटर टॅक्सी
author img

By

Published : Feb 20, 2022, 10:07 PM IST

मुंबई - मुंबई आणि नवी मुंबईला जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सीचे ( Mumbai Water Taxi ) उद्घाटन शुक्रवारी झाले आहेत. उद्यापासून पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मोठी वॉटर टॅक्सीच्या ( High Speed Water Taxi ) दोन फेऱ्या चालवण्याचा निर्णय ‘गेटवे-एलिफंटा प्लिजर टूर अँड ट्रॅव्हल्स लिमिटेड’ कंपनीने घेतला आहे. या हायस्पीड वॉटर टॅक्सीची क्षमता ५६ आसनी आहे. सध्या या वॉटर टॅक्सीचा तिकीट बुकिंगची ऑनलाईन व्यवस्था नसल्याने ( Water Taxi Online Booking ) प्रवाशांना थेट बंदरावर जाऊन तिकीट खरेदी करावी लागणार आहे.

बंदरावर थेट तिकीट विक्री होणार

वॉटर टॅक्सी सेवेमध्ये सर्वात कमी तिकीट दर हे ५६ आसनी बोटीचे आहेत. बेलापूर ते भाऊचा धक्का हा प्रवास ५० मिनिटांत पार करणाऱ्या या सेवेसाठी प्रवाशांना अवघे २९० रुपये मोजावे लागणार आहेत. वाहतुकदारांनी प्रवाशांचा प्रतिसाद पाहण्यासाठी सोमवारपासून या सेवेच्या दोन फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी ८.४५ वाजता बेलापूर बंदरावरून पहिली वॉटर टॅक्सी सुटेल. ही बोट सकाळी ९.५३ वाजता मुंबईतील भाऊचा धक्का येथील डोमेस्टीक क्रुज टर्मिनलवर पोहचणार आहे. तर सायंकाळी ६ वाजता डोमेस्टीक क्रुज टर्मिनलहून सुटणारी वॉटर टॅक्सी सायंकाळी ६.५० वाजता बेलापूर बंदर गाठेल. या सेवांना मिळणाऱ्या प्रतिसादानंतरच वॉटर टॅक्सीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणार असल्याचे असोसिएशनचे सभासद शराफत मुकादम यांनी सांगितले.

ऑनलाईन तिकीट सुविधा सुरू होणार

सर्वात मोठ्या वॉटर टॅक्सीची ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवा या आठवड्यात सुरु होणार आहेत. सध्या भाऊचा धक्का आणि बेलापुर या बंदरांवरील तिकीट खिडकीवर प्रवाशांना तिकीट खरेदी करता येईल. कमाल ५६ आसनी प्रवासी क्षमता असलेली ही वॉटर टॅक्सी कमीत-कमी प्रवाशांमध्येही चालवली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी निश्चिंतपणे प्रवासासाठी या सेवेचा वापर करण्याचे आवाहन मुकादम यांनी केले आहे.

वॉटर टॅक्सीची आसन क्षमता

एक ५६ सीटर, ४० सीटर, ३२ सीटर आणि एक २० सीटर हायस्पीड वॉटर टॅक्सी आहे. याशिवाय वेस्ट कोस्ट मरिन कंपनीकडे दोन १२ सीटर, आणि एक २० सीटर वॉटर टॅक्सी अशा सात वॉटर टॅक्सी सध्या तयार आहे. याउलट भविष्यात प्रतिसाद पाहून ६ आसनी आणि १० आसनी क्षमतेच्या प्रत्येकी दोन बोटी वाढवण्यात येतील. नेरूळ ते बेलापूर, जेएनपीटी ते एलिफंटा अशा अंतराने लहान असलेल्या जल मार्गांवर या बोटी चालवल्या जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.