ETV Bharat / city

नोकरीवरून काढल्याच्या रागावरून दोघांनी त्याच कंपनीत केली लाखोंची चोरी - मुंबई ताज्या बातम्या

कामावरून काढून टाकल्याच्या रागातून दोघांनी त्याच कंपनीत लाखोंची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे अडीच लाख रुपये आणि एक अॅक्टीवा गाडी जप्त केली आहे.

mumbai
mumbai
author img

By

Published : Aug 28, 2021, 8:53 PM IST

मुंबई - कामावरून काढून टाकल्याच्या रागातून दोघांनी त्याच कंपनीत लाखोंची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हर्ष मिश्रा (20) आणि त्याच्या साथीदाराने मोहम्मद आलम (21), असे या दोघांची नाव आहेत. पोलिसांनी दोघांनाही गोरेगाव पश्चिम येथून अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये आणि एक अॅक्टीवा गाडी जप्त केली आहे.

प्रतिक्रिया

दोघांनी मिळून केला होता प्लॅन -

दोन्ही आरोपी मालाड औद्योगिक वसाहत मालाड पश्चिम येथील डिलीवरी डॉट कॉम या कुरिअर कंपनीत काम करायचे. व्यवस्थित काम न केल्यामुळे कंपनी मालकाने एका आरोपीला दीड महिन्यापूर्वी नोकरीवरून काढून टाकले होते. तर दुसरा आरोपीचे या कंपनीत काम सुरु होते. दोघेही एकाच भागात राहत होते. दोघांनी मिळून अल्पावधीत श्रीमंत होण्याचा प्लॅन तयार केला. 25 ऑगस्टरोजी सकाळी दोन्ही आरोपी अॅक्टिवा बाईकवरुन कुरीअर कंपनीजवळ पोहचले. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या कार्यालयाचे दार उघडून 4 लाख रुपये रोखड लंपास केली. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोघांना गोरेगाव पश्चिम येथून अटक केली.

हेही वाचा - नारायण राणेंचे मानसिक स्वास्थ्य ठीक व्हावे म्हणून शिवसैनिकांनी प्रार्थना करावी - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.