ETV Bharat / city

Two Mosques Filed Charges in Mumbai : मुंबईत लाऊडस्पीकरबाबत सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावला, दोन मशिदींवर गुन्हा दाखल - Charges filed against cemetery mosque Mumbai

मुंबईतील वांद्रे आणि सांताक्रूझ भागातील दोन मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मशिदींविरुद्ध गुन्हा दाखल ( Two Mosques Filed Charges in Mumbai ) केला आहे. पोलिसांनी वांद्रे येथील नूरानी मशीद आणि सांताक्रूझ येथील कब्रस्तान मशिदीविरुद्ध गुन्हा दाखल ( Charges filed against cemetery mosque Mumbai ) केला आहे.

Two Mosques Filed Charges in Mumbai
मुंबईत दोन मशिदींवर गुन्हा दाखल
author img

By

Published : May 7, 2022, 7:26 PM IST

मुंबई - मुंबईतील वांद्रे आणि सांताक्रूझ भागातील दोन मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मशिदींविरुद्ध गुन्हा दाखल ( Two Mosques Filed Charges in Mumbai ) केला आहे. खरे तर सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कोणी स्पीकर वाजवत असेल तर त्याने ठरवून दिलेल्या डेसिबलच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र मुंबईतील दोन मशिदींनी त्याचे पालन केले नाही, या आरोपावरून पोलिसांनी वांद्रे येथील नूरानी मशीद ( Noorani Mosque ) आणि सांताक्रूझ येथील कब्रस्तान मशिदीविरुद्ध गुन्हा दाखल ( Charges filed against cemetery mosque Mumbai ) केला आहे.

या कलमांतर्गत गुन्हा दाखल - वांद्रे येथील नूरानी मशिदीच्या व्यवस्थापनावर सुप्रीम कोर्टाच्या नियमांचे पालन न केल्याचा आरोप आहे. यामुळे वांद्रे पोलिसांनी मशिदीच्या व्यवस्थापनाविरुद्ध IPC च्या कलम १८८ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (१), (३), १३५ आणि कलम ३३ (आर) (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर, सांताक्रूझ पोलिसांनी लिंक रोडवर असलेल्या कब्रस्तान मशिदीशी संबंधित लोकांवरही नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

म्हणून पोलिसांची कारवाई - पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी म्हणजे 5 तारखेला सकाळी वांद्रे इथल्या नूरानी मशीदमध्ये भोंग्यांवर नमाज अदा करण्यात आली. पहाटे सहा वाजण्याच्या आधी भोंग्याचा अथवा लाऊडस्पीकरचा कोणताही वापर न करता नमाज अदा करावी अशा सूचनाच पोलिसांनी एक दिवस अगोदर दिल्या होत्या. मात्र, पोलिसांच्या सूचनांकडे कानाडोळा करत मशिदीत सकाळच्या आजारांसाठी भोंग्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

राज ठाकरेंनी दिला होता इशारा - महाराष्ट्रात सध्या लाऊडस्पीकरचा वाद जोरात सुरू ( loudspeaker controversy ) आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी संबंधित आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारला मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता, तसे न केल्यास राज्यातील सर्व मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचे पठण करण्यात येईल. अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला होता.

काय आहे न्यायालयाचा निर्णय? - 2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोंगाट करणाऱ्या उपकरणांवर बंदी घातली होती. या आदेशानुसार लाऊडस्पीकर वाजवण्यापासून ते मोठ्या आवाजात संगीत, फटाके फोडण्यापासून हॉर्न वाजवण्यापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. सरन्यायाधीश आर सी लाहोटी आणि न्यायमूर्ती अशोक भान यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. या कलमाने आपल्या आदेशात रात्रीच्या वेळी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या कोणत्याही उपकरणांचा वापर करण्यास मनाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाऊडस्पीकरचा आवाज त्या क्षेत्रासाठी निश्चित केलेल्या ध्वनी मानकांपेक्षा जास्त नसावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. न्यायालयाने म्हटले आहे की, जेथे निश्चित मानकांचे उल्लंघन होत असेल तेथे राज्यांनी लाऊडस्पीकर आणि उपकरणे जप्त करण्याबाबत तरतूद करावी.

हेही वाचा - Raj Thackeray Ayodhya Tour : मनसे कार्यकर्त्याचा भाजप खासदाराला फोन; म्हणाला, "एकदा योगींचा सल्ला..."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.