ETV Bharat / city

Mauritius PMs convoy in Mumbai : मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या ताफ्यात मद्यधुंद व्यक्तींकडून कार घुसविण्याचा प्रयत्न; मुंबईत दोघांना अटक

रस्त्याच्या उत्तरेकडील भागावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिस हवालदाराने मॉरिशसच्या पंतप्रधानांचा ताफा ( Mauritius PMs convoy ) जाण्यासाठी वाहतूक थांबवली होती. परंतु यावेळी ताफ्याच्या दिशे जाणाऱ्या कारमधील दोन व्यक्तींनी हॉर्न वाजवण्यास ( Mumbai police arrest drunk persons ) सुरुवात केली, पोलिसांनी सांगितले.

Mauritius PMs convoy
मॉरिशस पंतप्रधान ताफा
author img

By

Published : Apr 20, 2022, 7:29 PM IST

मुंबई - मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ हे मुंबईच्या दौऱ्यावर आले आहे. त्यांच्या ताफ्यात मद्यधुंद अवस्थेत कार चालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक ( Two drunk men arrest ) केली आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. ही घटना सोमवारी दुपारी 1.50 वाजता पश्चिम द्रुतगती महामार्गावरून वांद्रे वरळी सी लिंकच्या ( rash driving case in C link ) दिशेने जात असताना घडली. आकाश अनिल शुक्ला (२४) आणि संतोष गिंडे (२२) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

रस्त्याच्या उत्तरेकडील भागावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिस हवालदाराने मॉरिशसच्या पंतप्रधानांचा ताफा ( Mauritius PMs convoy ) जाण्यासाठी वाहतूक थांबवली होती. परंतु यावेळी ताफ्याच्या दिशे जाणाऱ्या कारमधील दोन व्यक्तींनी हॉर्न वाजवण्यास ( Mumbai police arrest drunk persons ) सुरुवात केली, पोलिसांनी सांगितले.

पोलिसांना शिवीगाळ - कारमधील वाहन चालक आकाश शुक्लाने पुढे जाण्यास सुरुवात केली. सतत हॉर्न वाजवून घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. विदेशी व्हीआयपी व्यक्तीच्या मार्गात अनधिकृतपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनी दोघांना कारमधून पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारमधील संतोष गिंडे यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. आरोपी शुक्ला याने एक्सलेटरवर पाय ठेवत पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन चालविण्याचा प्रयत्न केल्याची पोलिसांनी तक्रार केली आहे.

आरोपींनी मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट- सी लिंककडे जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची कार अडवण्यात आली. दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांना भाभा रुग्णालयात नेण्यात नेले. तिथे वैद्यकीय चाचणीत त्यांनी मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय दंड संहितेच्या (IPC) 186 ( कर्तव्य पार पाडण्यात अडथळा आणणे ), 279 ( भरधाव वेगात वाहन चालविणे ) आणि 336 ( जीव धोक्यात घालणे ) यासह मोटार वाहन कायद्याच्या इतर कलमांसह विविध कलमांखाली दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-mauritius pm visit varanasi : मॉरिशसचे पंतप्रधान वाराणशीला देणार भेट, 'हे' आहे कारण

हेही वाचा-Minor Girl Molestation Nashik : नाशकात रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

हेही वाचा-Video : पोलिसांना चकमा देत न्यायालयातून आरोपी पळाला; शिताफीने पकडून केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.