मुंबई : अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दोन कारची धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. महामार्गावरील हलोली पडोसपाडा येथे सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात एकाचा मृत्यु झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर पोलीस ठाणे हद्दीतील हालोली पडोसपाडा येथे मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी एक कार अनियंत्रित झाल्याने ती दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला गेली. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारला ती धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की यात समोरील कार चक्काचुर झाली आहे. या भीषण अपघातात, एका कारमधील चालकाचा मृत्यु झाला. शोभीत कुमार दास (वय- 41 रा. सुरत) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याशिवाय इतर तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तिघांनाही मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. मात्र महामार्ग पोलीसांनी दोन्ही अपघातग्रस्त गाड्या बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन जखमी - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातात 1 ठार
महामार्गावरील हलोली पडोसपाडा येथे सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात एकाचा मृत्यु झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.