मुंबई - संरक्षित जलचर प्राणी म्हणून घोषित असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची बेकायदेशीर तस्करी केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 7 कोटी 75 लाखांची तस्करी केलीआहे. तस्करी करणाऱ्या व्यक्तींवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान, दोघांना अटक केली आहे.
दोन्ही व्यक्ती हे रायगड जिल्ह्यातील
व्हेल माशाची उलटी (ambergris)हा पदार्थ व्हेल माशाच्या पोटात तयार होतो. सदरच्या या व्हेल माशाच्या उलटीचा वापर उच्च प्रतीचे अत्तर, औषध, सिगरेट, मद्य हे बनवण्यासाठी होतो. तसेच, खाद्यपदार्थांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. क्राइम ब्रँचने (23 जून)रोजी काहीजण संरक्षित प्राणी म्हणून घोषित केलेले आहेत. यामध्ये व्हेल माशाचाही समावेश आहे. दरम्यान, या माशांच्या उलटीची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंबईतील सिताराम मिल कंपाऊंड, लोअर परळ या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता. त्या ठिकाणी 2 व्यक्ती संशयास्पद आढळून आले. त्यानंतर या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची तपासणी केली. दरम्यान, त्यांच्याकडून तब्बल 7 किलो 350 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी ताब्यात घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 7 कोटी 75 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात अटक करण्यात आलेले दोन्ही व्यक्ती हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आहेत.