मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाबरोबरच विधानपरिषदेच्या सदस्य पदाचा राजीनामा ( Uddhav Thackeray Resign MLA Seat ) दिला. या रिक्त झालेल्या जागेसाठी रस्सीखेच सुरू झाली असून शिंदे गट आणि शिवसेनेकडून दावा केला जातो आहे. या जागेवरून पुन्हा एकदा शिंदे गट आणि शिवसेना आमने सामने ( Shinde group and Shiv Sena dispute ) येणार आहेत.
विधान परिषदेच्या जागेसाठी रस्सीखेच - शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )यांच्या बंडानंतर दिवसा गणित शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सामील होत ( Shiv Sena Leaders Joins Shinde Group ) आहेत. शिवसेनेला यामुळे मोठे खिंडार पडले आहे. शिंदे गटाकडून शिवसेना आमची असल्याचा दावा केला जातो आहे. तर पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी कंबर कसली आहे. तसेच न्यायालयीन लढाईतून शिंदे गटाला आव्हान दिला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेची जागा कोणाची यावरून आता दोन्ही गटात दावे - प्रतिदावे सुरू झाले आहेत.
निर्णय अद्याप न्यायप्रविष्ठ - राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केला. सरकार अल्पमतात आल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शासकीय वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीकडे कूच केली. त्यानंतर फेसबुक लाईव्ह येऊन मुख्यमंत्री आणि विधान परिषदेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. शिवसेना आणि शिंदे गटाकडून या जागेवर दावा सांगितला जातो आहे. राज्य विधिमंडळात शिंदे गटाकडे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळेल असा शिंदे गटाचा होरा आहे. तर शिंदे यांच्या प्रकरणाचा निर्णय अद्याप न्यायप्रविष्ठ आहे. शिवसेना हा विधिमंडळातील पक्ष आहे. त्यामुळे ही जागा आमची आहे, असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.
कोणाला मिळणार संधी - राज्य विधान परिषदेच्या जागेवर शिंदे गटाकडून रामदास कदम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर शिवसेनेकडून आक्रमक आणि कट्टर शिवसैनिकाला विधान परिषदेत पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेत सध्या गळती वाढत असल्याने नावाबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.
लोकशाही आणि संविधानाचा कायदा - १ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालय देशातील लोकशाही आणि संविधानातील कायद्यांबाबत भूमिका स्पष्ट करणार आहे. शिवसेनेच्या बाजूने हा निकाल लागेल, असा विश्वास देशातील विधीज्ञ आणि कायदेतज्ञ करत आहेत. परंतु सरन्यायाधीशांच्या निर्णयावर सगळं अवलंबून असणार आहे. मात्र शिवसेनेची बाजू भक्कम आहे. त्यामुळे विधान परिषदेवर आमचा उमेदवार जाईल, असे विधान परिषदेतील शिवसेनेचे आमदार सचिन अहिरे यांनी सांगितले.
हेही वाचा - 1 kg Kidney Stone : पोटातून काढला तब्बल एक किलोचा मुतखडा... डॉ. आशिष पाटील यांची आशिया बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल