ETV Bharat / city

Elections To Local Bodies 2022: प्रभाग रचना पहिल्यासारखीच! शिंदे सरकारच्या निर्णयाने शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता - Ward composition

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीत शिवसेनेची कोंडी करण्यासाठी जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. ( Elections To Local Bodies 2022 ) शिवसेनेसाठी हा मोठा धक्का तर भाजपाला फायदा मानला जात आहे.

मुंबई महानगरपालिका
मुंबई महानगरपालिका
author img

By

Published : Aug 3, 2022, 9:53 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने वॉर्डची संख्या २२७ वरून वाढवून २३६ केली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा निर्णय पुन्हा २२७ वॉर्डनुसार निवडणुका होतील असा निर्णय घेतला आहे. ( Elections To Local Bodies ) २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग रचनेचा फायदा भाजपला झाला होता. यामुळे यंदाच्या निवडणुकीसाठीही भाजपालाच फायदा होणार आहे. वाढलेल्या नवीन ९ वॉर्डमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असल्याने या बदललेल्या निर्णयाचा शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पालिका निवडणूक २२७ वॉर्डनुसार - मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार होती. मात्र, कोरोनामुळे ही निवडणुक वेळेवर होऊ शकलेली नाही. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने पालिकेतील २२७ वॉर्डच्या संख्येत ९ ने वाढ करत २३६ वॉर्ड केले. त्यासाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात आली होती. ( Ward Composition ) ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने मे महिन्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षण लॉटरी काढण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल केल्यावर २९ जुलैला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आरक्षण वगळून ओबीसी आणि महिला आरक्षण लॉटरी काढण्यात आली. यावर ३९९ हरकती सूचना आल्या आहेत. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने पालिका निवडणूक २२७ वॉर्ड नुसार होणार असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपाला फायदा होणार - राज्यात आणि केंद्रात २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले. पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीच्या आधी २०१६ मध्ये प्रभाग रचना करण्यात आली. यामुळे भाजपाला फायदा झाला. २०१२ मध्ये भाजपचे ३२ नगरसेवक निवडून आले होते. २०१७ मध्ये त्यात वाढ होऊन भाजपचे ८२ तर शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले. प्रभाग पुनर्रचनेचा सर्वाधिक फायदा भाजपाला झाला होता. आता पुन्हा २०१७ मधील वॉर्ड पुनरर्चना असल्याने त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे.

भाजपकडून निर्णयाचे स्वागत - २०११ मध्ये जणगणना झाली होती. त्यानंतर जनगणना झाली नाही. २०१७ ची निवडणूक २०११ च्या जनगणनेवर आधारित होती. मग यावेळी ९ वॉर्ड कसे वाढवले. या विरोधात आम्ही आंदोलन करून आयुक्तांना गुलाबाचे फुलंही दिले होते. पालिकेचे २३६ प्रभाग केल्यावर त्याविरोधात अनेकांनी हरकती घेतल्या त्यावर कोणत्याही प्रकारची सुनावणी घेण्यात आली नव्हती. यामुळे राज्य सरकारने २२७ प्रभागानुसार निवडणूक घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.

आम्ही नेहमीच तयार - महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय रद्द करत आहे. त्याचप्रमाणे आघाडी सरकारने केलेली वॉर्ड पुनरर्चना आणि आरक्षणही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेला धरून जे योग्य आहे तेच व्हावे. नागरिकांना सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते दिवस रात्र काम करत आहेत. पालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया पालिकेतील माजी गटनेत्या राखी जाधव यांनी दिली आहे.

काँग्रेसकडूनही स्वागत - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी चुकीच्या पद्धतीने केलेले सीमांकन विद्यमान सरकारने रद्द केले आहे. २३६ प्रभागाऐवजी २२७ प्रभाग वॉर्डांची जुनीच रचना कायम ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. वॉर्डची सोडत, लॉटरी पद्धतीत ज्या पद्धतीने मानवी हस्तक्षेप झाला आहे, त्यातही लक्ष घालून निवडणूक निष्पक्षपणे होईल यासाठी लक्ष घालावे अशी प्रतिक्रिया पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली आहे.

पालिकेतील वॉर्ड आरक्षण -

  • एकूण वॉर्ड - २२७
  • अनुसूचित जाती - १५
  • अनुसूचित जमाती - २
  • ओबीसी - ६१
  • महिला आरक्षण - ५० टक्के

पालिकेतील पक्षीय बलाबल

  • शिवसेना - ९७
  • भाजपा - ८२
  • काँग्रेस - २९
  • राष्ट्रवादी - ९
  • समाजवादी पक्ष - ६
  • एमआयएम - २
  • मनसे - १

हेही वाचा - Elections To Local Bodies: जुन्या प्रभाग रचनेनुसारचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; शिंदे सरकारचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.