मुंबई - भारतरत्न लता मंगेशकर, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना आज मंत्रिमंडळ बैठकीत ( Maharashtra State Cabinet Meeting ) श्रद्धांजली वाहण्यात ( Tributes To Lata Mangeshkar Ramesh Deo In Cabinet Meeting ) आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) होते. भारतरत्न लता मंगेशकर यांच्याबाबतचा शोकप्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तर ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्याबाबतचा शोक प्रस्ताव उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ( Minister Subhash Desai ) वाचला. यावेळी सर्वांनी स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहिली.
राज्यात स्वत:च्या जागेत विभागीय व जिल्हा माहिती कार्यालये, माहिती भवन उभारणार
राज्यात विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयांच्या इमारती व माहिती भवन उभारुन माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिक बळकटीकरण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. माहिती जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासकीय योजनांची प्रसिद्धी केली जाते. या महासंचालनालयाच्या अंतर्गत आठ विभागीय माहिती कार्यालये आहेत. परंतू बहुतांश माहिती कार्यालये भाड्याच्या जागेत असून, अप्रत्यक्षपणे त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यामुळे अशा सर्व अधिनस्त माहिती कार्यालयासाठी स्वत:ची जागा मिळवून, कार्यालयाची इमारत बांधकाम, बळकटीकरण, पायाभूत सुविधा निर्मिती करण्यासाठी विभागीय व जिल्हा माहिती कार्यालय, माहिती भवन इमारत बांधकाम योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती शासकीय जमिन प्राप्त करुन घेण्यात येईल.
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ करण्याचा निर्णय निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आदिवासी लोकसंख्या 1500 पेक्षा जास्त असलेल्या भागात 75लाख रुपये, 1000 ते 1499 पेक्षा जास्त असलेल्या भागात 50 लाख रुपये, 500 ते 999 पेक्षा जास्त असलेल्या भागात 35 लाख रुपये, 499 पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असलेल्या 25 लाख रुपये अशा सुधारीत आर्थिक निकषांमध्ये 5 वर्षांपर्यंत कामे घेता येतील.
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा
ही योजना सन 2021-22 पासून राज्यस्तरावर वर्ग करण्यात आली आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्र, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्र,माडा,मिनीमाडा व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्राबाहेरील 50 टक्के व त्यापेक्षा जास्त अनुसुचित जमातीची लोकसंख्या असलेल्या वस्त्या / पाडे / वाड्या / गाव/ नगर पंचायती / नगरपरिषदा /नगरपालिका /महानगरपालिका या मधील वार्ड/प्रभाग यांचा विकास करण्याबाबत सुचविण्यात येणाऱ्या कामांना सुधारीत निकष लावण्यात येतील.