ETV Bharat / city

Aarey Metro Car Shed Project : अडानी पॉवर प्लांटसाठी पुन्हा एकदा वृक्षतोडीच्या कामाला सुरुवात; ठाकरेंनी शब्द 'मोडला' ?

author img

By

Published : Feb 18, 2022, 9:56 AM IST

आरे कॉलनी येथील मेट्रो कारशेडवरून ( Aarey Metro Car Shed Project ) वाद उफाळण्याची शक्यता आहे. मेट्रो कारशेड बाजूला असलेल्या अडानी पॉवर प्लांटसाठी पुन्हा एकदा वृक्षतोडीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

Tree felling resumes for Adani Power Plant
Tree felling resumes for AdanTree felling resumes for Adani Power Planti Power Plant

मुंबई - आरे कॉलनी येथील मेट्रो कारशेडचं ( Aarey Metro Project ) बांधकाम पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 2019 आली युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरे कॉलनी येथील युनिट 19 मध्ये झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. त्यावेळी खूप मोठा वाद निर्माण झाला होता. असाच काही वाद आता पुन्हा होण्याची शक्यता आहे. कारण, मेट्रो कारशेड बाजूला ( Aarey Metro Car Shed Project ) असलेल्या अडानी पॉवर प्लांटसाठी ( Adani Power Plant ) पुन्हा एकदा वृक्षतोडीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

अडानी पॉवर प्लांटसाठी पुन्हा एकदा वृक्षतोड
आदित्य ठाकरे यांनी दिला होता शब्द -

2019 ला जेव्हा पहिल्यांदा वृक्षतोड करण्यात आली, तेव्हा या वृक्षतोडीविरोधात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता. यातील काही आंदोलक विद्यार्थ्यांना अटकही करण्यात आली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेचे नेते म्हणून शब्द दिला होता, की 'मेट्रो कारशेड आरेमध्ये होऊ देणार नाही. मेट्रो कारशेड इतर ठिकाणी बांधण्यासाठी आम्ही सरकारला विनंती करू'. जेव्हा त्यांनी शब्द दिला होता, तो काळ विधानसभा निवडणुकांचा होता.

ठाकरेंनी शब्द तोडला ?

सध्याच्या घडीला आदित्य ठाकरे राज्याचे पर्यावरण मंत्री आहेत. मात्र, आरे कॉलनीमध्ये पुन्हा एकदा वृक्षतोड झाल्याने आदित्य ठाकरे यांनी आरे कॉलनी रहिवाशांना दिलेला शब्द न पाळण्याचे समोर आले आहे.

उरलेली झाड वाचवणं आमचे ध्येय -

या संदर्भात बोलताना 'सेव्ह आरे' ही मोहीम उभारणाऱ्या पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्त्या अमृता भट्टाचार्य म्हणाल्या की, "यांनी आधी शब्द दिला होता आम्ही मेट्रो कारशेड आरे मधून इतर ठिकाणी हलवू. त्यानंतर, माध्यमांमधून बातम्या येऊ लागल्या की, आरे मधील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे बांधण्यात येणार आहे. मात्र, त्या फक्त बातम्या आणि चर्चाच आहेत. कारण, प्रत्यक्षात आरेमध्ये मेट्रोचे काम थांबलेलं नाही. दोन वर्षात मेट्रोने खुप काम केलं आहे. आम्हाला शंका आहे हे लोक आता फक्त कारणं देतील आम्ही जागा शोधतोय आणि शेवटी जनतेला सांगतील, आता मेट्रोचं काम पूर्ण झालेला आहे त्या ठिकाणी नाही हलवू शकत.

हेही वाचा - Uttar Pradesh Assembly Election : पाच वर्षात पहिल्यांदाच अखिलेश, मुलायमसिंह आणि शिवपाल दिसले एकत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.