ETV Bharat / city

Silver Oak Attack Case : गावदेवी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी - गावदेवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बदली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात राज्य गृहमंत्रालयाने दखल घेतली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. तपासादरम्यान काही वेगवान हालचाली घडत असताना आता गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोपीनाथ राजभर यांना हटवण्यात आले आहे. याआधी या घटनेनंतर पोलीस उपायुक्त योगेशकुमार गुप्ता यांची बदली करण्यात आली होती. पवार कुटुंबीय तसेच सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 10, 2022, 7:23 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी शुक्रवारी 8 एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणी गृह विभागाने गावदेवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकाऱ्याची उचलबांगडी केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात DCP झोने- 2 चे अधिकारी यांची बदली करण्यात आल्यानंतर आज (रविवारी) पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

याप्रकरणाची राज्य गृहमंत्रालयाने दखल घेतली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. तपासादरम्यान काही वेगवान हालचाली घडत असताना आता गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोपीनाथ राजभर यांना हटवण्यात आले आहे. याआधी या घटनेनंतर पोलीस उपायुक्त योगेशकुमार गुप्ता यांची बदली करण्यात आली होती. पवार कुटुंबीय तसेच सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या पीएसयूवर असेल. मुंबई पोलिसांचे एक वाहन आणि दोन अधिकारी त्यांच्या सुरक्षेत तैनात असतील. सिल्व्हर ओक तसेच बारामतीमधील गोविंदबाग येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण? : 8 एप्रिलला दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. यावेळी जमाव आक्रमक होऊन पवार यांच्या घरावर दगड, चप्पल फेकही केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - Sharad Pawar In Amaravati : हिंदवी स्वराज्य सर्व जातींनी एकत्रित स्थापन केलेले राज्य - शरद पवार

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.