मुंबई - मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या तब्बल ३०० अधिकाऱ्यांची एकाच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेरबदली करत सर्वांना झटका दिला आहे. यामुळे मंत्रालयात मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत.
३०० अधिकाऱ्यांच्या बदल्या -
मंत्रालयात एकाच ठिकाणी तळ ठोकून असलेले अधिकारी सचिवांपेक्षा जास्त अधिकार गाजवत असल्याची चर्चा मंत्रालयातील अधिकारी वर्तुळात होत होती. एकाच विभागात अधिकारी अधिककाळ असल्याने कॅबिनेट सदस्यांना बदली करणे कठीण होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यांनतर ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. यावर बराच काळ विचार करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मंत्रालयातील एकाच जागी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ३०० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनीही केले होते प्रयत्न -
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या करत सर्वांना झटका दिला आहे.
हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, दोन महिन्यांपासून रखडलेले वेतन मिळणार