मुंबई - एल.टी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक सुरळीत करत असलेल्या ट्रॅफिक पोलिसला एका महिलेने बेदम मारले. यानंतर संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. एकनाथ श्रीरंग पार्टे असे वाहतूक पोलिसाचे नाव आहे. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीवरून विना हेल्मेट जाणाऱ्या मोहसीन निजामुद्दीन खान यास पोलीस हवलदार एकनाथ पारठे यांनी आडवले. विना हेल्मेट गाडी चालवण्यासाठी दंड आकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोटारसायकलच्या मागील सिटवर बसलेल्या सादविका तिवारी या महिलेने पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. अचानक या महिलेने पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर धरून त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली.
![police beaten by woman](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-06-24-cop-7201159_24102020131231_2410f_1603525351_242.jpg)
पोलिसांनी कलम 353, 332, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या सादविका रमाकांत तिवारी (वय - 30) व मोहसिन निजामउद्दीन खान (वय - 26) यांना अटक केली आहे.
![police beaten by woman](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-06-24-cop-7201159_24102020131231_2410f_1603525351_829.jpg)