- कराड (सातारा) - सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने सातारा जिल्ह्यात मोठी जीवीत आणि अर्थिक हानी झाली आहे. याचा सर्वाधिक फटका पाटण तालुक्याला बसला आहे. भूस्खलन होऊन तीन गावांतील 21 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 8 जण अद्याप बेपत्ता आहेत. एनडीआरएफची टीम बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. सविस्तर वृत्त -
- मुंबई - राज्यात पुरस्थिती व अतिवृष्टीमुळे एकूण ११२ जणांचे मृत्यू झाले आहेत. तर १,३५,३१३ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ही माहिती मदत व पुनर्वसन विभागाने शनिवारी रात्री साडेनऊ वाजता दिली आहे.मदत व पुनर्वसन विभागाच्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३, २२१ जनावरांचे मृत्यू झाले आहेत. एकंदर ५३ लोक जखमी आहेत. तर ९९ लोक बेपत्ता आहेत. सविस्तर वृत्त -
- मुंबई - पोर्नोग्राफिक गुन्हे प्रकरणात अटकेत मुंबई पोलीस गुन्हे शाखेने बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी केली आहे. शिल्पा शेट्टीने हॉट अॅपपमधील कंटेन्टबाबत माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले. सविस्तर वृत्त -
- मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या कार्यालयाची तपासणी केली. या तपासणीमध्ये पोलिसांना कुंद्राच्या कार्यालयात छुपे कपाट आढळून आले आहे. सविस्तर वृत्त -
- सांगली - 2019 च्या तुलनेत यंदा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला. मात्र सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. हळू-हळू हा पूर येत्या काही तासात ओसरायला सुरुवात होईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच जिल्ह्यातील पूर ओसरल्यावर तातडीने पुर नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. सविस्तर वृत्त -
- टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार नेमबाज मनु भाकरने निराश केले. तिला महिला 10 मीटर एअर पिस्टलच्या पात्रता फेरीत पराभव पत्कारावा लागला. मनु भाकर 600 पैकी 575 गुणांसह 12 व्या स्थानी राहिली. दरम्यान, फायनल फेरीसाठी टॉपचे 8 खेळाडू पात्र ठरतात. मनु भाकरकडून पदकाची आशा होती परंतु तिने निराशा केली. सविस्तर वृत्त -
- मुंबई - राज्यात मागील तीन दिवसांपासून सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे, तर काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 59 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. तरी अद्याप या भागात बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत पूरग्रस्त भागातून सुमारे 90 हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. तर या दरम्यान 75 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्त -
- मुंबई - राज्यात पूरपरिस्थिती गंभीर असून राज्य सरकारने कागदी घोडे न नाचवता मदत आणि पुर्नवसन कार्याला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर ह्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील पूर परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन धोरण कुचकामी असून दरवर्षी काहीही प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत असा आरोपही वंचितने केला आहे. सविस्तर वृत्त -
- कोल्हापूर - कोल्हापुरात यावर्षी 2019 पेक्षाही भयानक अशी महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये झालेल्या विविध दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या मदतीने नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. जिल्ह्यातील तब्बल 14 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी असलेल्या 'कॅम्प'मध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. सविस्तर वृत्त -
- मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थित महाराष्ट्र सरकारकडूनही मराठा आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. राज्यातील खासदारांना यासंदर्भातील पत्र देत चव्हाण यांनी आरक्षणासाठी आजपासून जोरदार मोहीम सुरू केली आहे. सविस्तर वृत्त -
Top 10 @ 11 AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या.. - महत्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना, पाऊस यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 11 AM

Last Updated : Jul 25, 2021, 11:29 AM IST