ETV Bharat / city

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - विरारमधील आयर्नमॅन हार्दिक पाटील

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...

author img

By

Published : May 31, 2021, 6:55 AM IST

Updated : May 31, 2021, 1:01 PM IST

सोलापूर- ऐकावं ते नवलच, पैसा कमवण्यासाठी माणूस काहीही करू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मध्य रेल्वेच्य सोलापूर विभागात एसी मेकॅनिक इंजिनिअर असणाऱ्या देविदास काळे याला पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. देविदास काळे हा सुटीच्या दिवशी काही रेकॉर्डवरील चोरट्यांना सोबत घेऊन खेडोपाडी जाऊन गाई म्हशींची चोरी करायचा. अखेर पोलिसांनी या अभियंत्याला बेड्या ठोकल्या आहेत. सविस्तर वाचा..

मुंबई - राज्यात इंधन दरवाढ सुरुच आहे. पेट्रोलच्या दराने शनिवारीच शंभरी पार केली. मुंबईत पेट्रोल १०० रुपये ५१ पैसे, तर डिझेल ९२ रुपये ४९ पैसे झाले आहे. पेट्रोलच्या दरात लिटरमागे २८ पैसे, तर डिझेल दरात ३२ पैसै वाढ करण्यात आल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी जाहीर केले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात परभणीतील पेट्रोलचे दर आधीच शंभरीपार गेले होते. आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलदर शंभरीपार गेले आहेत. सविस्तर वाचा..

दरभंगा - 'सायकल गर्ल' ज्योतीचे वडील मोहन पासवान यांचे सोमवारी निधन झाले. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ज्योतीने आपल्या वडिलांना घेऊन अवघ्या सहा दिवसांमध्ये गुडगाव ते दरभंगा असा 1200 किलोमिटरचा प्रवास सायकलवर केला होता. तेव्हापासून ती संपूर्ण देशात सायकल गर्ल नावाने प्रसिद्ध झाली. सविस्तर वाचा..

मुंबई- मुंबईतील कोकरी आगार, वडाळा येथील न्यू म्हाडा वसाहतीत रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास वसंतकुमार देवेंद्र या 31 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, न्यू म्हाडा वसाहत येथील, बिल्डिंग नंबर ए-7 मध्ये राहणाऱ्या वसंतकुमार देवेंद्र याचं काही दिवसांपूर्वी परिसरात राहणाऱ्या काही व्यक्तींसोबत वाद झाला होता. सविस्तर वाचा..

मुंबई - कोणत्या पध्दतीने ओबीसी आरक्षण देता येईल याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करून ज्या काही प्रक्रिया करणे गरजेच्या आहेत त्या पूर्ण करुन पुढे जाऊ, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. सविस्तर वाचा..

पालघर - विरारमधील आयर्नमॅन हार्दिक पाटील यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. स्वागत बंगलो, वर्तक वाॅर्ड विरार पश्चिम येथे ४ मे च्या रात्री ११.४३ ते ११.५० दरम्यान हा हल्ला झाला आहे. हिरव्या रंगाच्या स्कूटरवरून येऊन, पेट्रोल भरलेल्या काचेच्या बाॅटलमधील कोंबलेल्या कपड्यास आग लावून ती पेटती बाॅटल हार्दीक पाटील यांच्या राहत्या बंगल्यामधील गेटच्या आतील भागात फेकून हा हल्ला करण्यात आलेला आहे.ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. सविस्तर वाचा..

औरंगाबाद- भावाच्या मुलाचे लग्न आटोपून, दुचाकीने बीड जिल्ह्यातील राजपिंप्री गावाच्या दिशेने निघालेल्या आई व मुलाला समोरुन भरधाव आलेल्या कारने चिरडले. रविवारी दुपारी चारच्या सुमारास नवीन बायपास रस्त्यावरील, गांधेली शिवाराजवळ हा अपघात घडला. या अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. सविस्तर वाचा..

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर यासंदर्भात ड्रग्स सिंडिकेट प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडुन तपास केला जात आहे.या प्रकरणात फरार आरोपी व त्याचा मित्र सिद्धार्थ पीठाणी, यास हैदराबाद येथून अटक केल्यानंतर या प्रकरणी आता सुशांतसिंग राजपूत यांच्या घरातील नोकर, नीरज व केशव या दोघांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेले आहे. सविस्तर वाचा..

मुंबई - सिडकोने आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाच्या योजनांतर्गत अडीच वर्षांपूर्वी नवी मुंबईतील विविध भागातील घरांची सोडत काढली. या सोडतीमधील घरे उभारण्याच्या कामात लॉकडाऊनमुळे अनेक संकटे आली. त्यावर मात करत बी.जी. शिर्के कन्ट्रक्शन टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीने ही घरे सिडकोला तातडीने ताब्यात देण्याचा शब्द पाळला आहे. त्याप्रमाणे जून महिन्याच्या अखेरीस सुमारे 15 हजार घरांचा ताबा सिडकोला देण्यात येणार असून विजेत्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. सविस्तर वाचा..

नागपूर - राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत दरवर्षी 31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू नकार दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी 60 लाख लोकांचा तंबाखू सेवनाने मृत्यू होतो. 2030 पर्यंत ही संख्या 80 लाखांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल अडल्ट टोबॅकोचे 2016 -17 मध्ये सर्वेक्षण झाले असून, यात 15 वर्षांपासून ते वृध्दांपर्यंतचे सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालानुसार, भारतामध्ये 28.6 टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. सविस्तर वाचा..

Last Updated : May 31, 2021, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.