- भोपाळ/विदिशा - मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातील गंजबासौदा येथे गुरूवारी सायंकाळी विहिरीत पडलेल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना विहिरीचा कठडा धसला. या घटनेत ४०हून अधिक जण विहिरीत कोसळले. त्यानंतर एनडीआरएफ आणि एसएडीआरएफ टीमकडून ३० तास बचाव कार्य सुरू होते. यात विहिरीतून मुलासह ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, १९ जणांना गुरूवारी उशिरा रात्री सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. सविस्तर वृत्त -
- औरंगाबाद - व्हिडिओकॉन कंपनीवर ईडीने छापे टाकले आहेत. औरंगाबाद येथील चितेगावमधील व्हिडिओकॉन कंपनी आणि औरंगाबाद शहरातील धुत यांच्या कार्यालयासह इतर ठिकाणीही ईडीने छापे टाकले आहेत. गुरूवारपासून झाडाझडती सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सविस्तर वृत्त -
- मुंबई - राज्यात महाविकास आघाडीतील अनेक नेते केंद्रिय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. अशात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड यांच्यावर निशाना साधला आहे. एसआरएमध्ये गैरव्यवहार सुरु असून येथेही प्रविण कलमे हा 'नवा वाजे' उदयास आल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच दोघांचीही मुख्यमंत्र्यांनी हाकलपट्टी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली. सविस्तर वृत्त -
- पुणे - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यातून गैरसमज होतोय, हे खर आहे. परंतु, सर्वांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तसेच, लोकांमध्ये जाऊन आपल्या पक्षाचे संघटन मजबूत करण्याबद्दलही दुमत नाही. मात्र, प्रतिक्रिया देताना, किंवा भूमिका मांडताना ती विचारपुर्वक मांडायला हवी, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. सविस्तर वृत्त -
- मुंबई - राजकीय सुडापोटी केंद्र सरकार आणि तपास एजन्सी काम करत आहेत, असे आरोप करणाऱ्यांवर आजची अनिल देशमुख यांच्यावरील ईडीची कारवाई ही एक चपराक असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व्यक्त केले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई करत ४.२० कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली. ईडीच्या तपास प्रक्रियेत देशमुख यांची ही प्रॉपर्टी मिळालीय आणि ती सीझ झालीय, याचा अर्थ असा की, अशी प्रॉपर्टी होती. म्हणूनच त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत व तपासात तथ्य आहे. म्हणूनच ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. सविस्तर वृत्त -
- पणजी - हॅकरकडून फेसबुक व ट्विटर अकाउंट हॅक होणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र, हॅकरने थेट गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे फेसबुक अकाउंट हॅक केले. त्यानंतर धक्कादायक प्रकार घडला आहे. सविस्तर वृत्त -
- मुंबई - हे सरकार आपल्याच कर्माने कोसळेल, आणि हे सरकार जेव्हा कोसळेल त्या वेळेस आम्ही पर्यायी सरकार देऊ असा दावा विधानपक्ष विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून अजूनही सुरू आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आम्ही सरकार पाडणार नाही, पण पडल्यास पर्यायी सरकार देऊ असेही फडणवीस म्हणाले. सरकार स्थापनेसाठी भाजप कडून अजून पर्याय उपलब्ध आहेत का? यावर देखील आता तर्क वितर्क लावले जात आहेत. सविस्तर वृत्त -
- मुंबई - स्थानिक भागात कोणत्या सेवा मिळतात, याची माहिती घेण्यासाठी अनेकदा ग्राहक जस्ट डायलचा वापर करतात. मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने लोकल सर्च इंजिन असलेल्या जस्ट डायलमध्ये आज मोठा हिस्सा घेतला आहे. हा आर्थिक व्यवहार सुमारे 3,487 कोटी रुपयांचा असल्याचे रिलायन्सने जाहीर केले आहे. सविस्तर वृत्त -
- मुंबई - लॉकडाऊन ठेवायचा की नाही, याबाबत काहीही निर्णय घ्या, पण माणसाचा माणूस म्हणून विचार करा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला केले आहे. तसेच आता जनजीवन सुरू केले पाहिजे, नाहीतर लोकं वेडे होतील, अशी भीतीदेखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. सविस्तर वृत्त -
- नागपूर - आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. त्या अनुषंगाने शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांचे कौतुक करत तसे संकेत देखील दिले होते. या विषयी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की या सर्व प्रक्रियेला अजून वेळ आहे, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. सविस्तर वृत्त -
Top 10 @ 11 AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या.. - Top 10 @ 9 AM
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
Top 10 @ 11 AM

Last Updated : Jul 17, 2021, 11:13 AM IST