ETV Bharat / city

Vaccine shortage : मुंबईत बुधवारी लसीकरण राहणार बंद

आज (मंगळवारी) ३०९ पैकी ५८ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. लसीचा तुटवडा असल्याने आज मंगळवारी महापालिका आणि सरकारी ५८ लसीकरण केंद्रांवरच लसीकरण सुरू होते. लसीचा साठा नसल्याने उद्या (बुधवारी) २१ जुलै रोजी लसीकरण बंद राहणार आहे.

लसीकरण
लसीकरण
author img

By

Published : Jul 20, 2021, 9:06 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. या दरम्यान नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे लसीचा तुटवडा भासत असल्याने लसीकरण मोहीम अनेकवेळा ठप्प झाली आहे. लसीचा साठा नसल्याने उद्या (बुधवारी) २१ जुलै रोजी लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लसीकरण बंद -

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान दिवसाला ६० ते ७० हजार लसीचे डोस दिले जात आहेत. नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने आतापर्यंत दिवसाला १ ते दीड लाख लसीचे डोस देण्यात आले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असताना लस उत्पादक कंपन्यांकडून लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. आज (मंगळवारी) ३०९ पैकी ५८ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. लसीचा तुटवडा असल्याने आज मंगळवारी महापालिका आणि सरकारी ५८ लसीकरण केंद्रांवरच लसीकरण सुरू होते. लसीचा साठा नसल्याने उद्या (बुधवारी) २१ जुलै रोजी लसीकरण बंद राहणार आहे. लसीचा साठा आल्यावर लसीकरण पुन्हा सुरू केले जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

लसीकरण मोहीम -

मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. आरोग्य, फ्रंट लाईन कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वयोगटातील, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. केंद्र सरकारने १९ मेला घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेने २५ मेपासून स्तनदा मातांचे आणि गर्भवती महिलांचे लसीकरण सुरू केले आहे. परदेशात जाणारे विद्यार्थी, कर्मचारी तसेच ऑलम्पिक खेळाडू, जेलमध्ये असलेले कैदी, तृतीयपंथी, मानसिक रुग्ण आदींचे लसीकरण केले जात आहे.

६५ लाख २४ हजार लाभार्थ्यांना लस -

मुंबईत १६ जानेवारीपासून १९ जुलैपर्यंत ६५ लाख २४ हजार ८४१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात ५० लाख २८ हजार ३४३ लाभार्थ्यांना पहिला तर १४ लाख ९६ हजार ४९८ लाभार्थ्यांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत आरोग्य, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना ७ लाख ५ हजार ७५६, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना १५ लाख ३५ हजार ७६८, ४५ ते ५९ वयोगटातल्या १९ लाख ६० हजार ९८५, १८ ते ४४ वयोगटातल्या २३ लाख ४ हजार ६५८, स्तनदा मातांना ३७४९, गर्भवती महिलांना ७२, परदेशी शिक्षण घेणारे विद्यार्थी- परदेशी नोकरीसाठी जाणारे नागरिक, टोकियो ऑलम्पिकसाठी जाणारे खेळाडू यांना १२ हजार ८१३, मानसिक रुग्णांना ७८४, ओळखपत्र नसलेले जेलमधील कैदी तृतीयपंथी यांना २५६ लसीचे डोस देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.