ETV Bharat / city

MAHARASHTRA BREAKING : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयास ईडीकडून अटक - ajit pawar latest news

Big Breaking
Big Breaking
author img

By

Published : Jul 7, 2021, 6:39 AM IST

Updated : Jul 7, 2021, 10:36 PM IST

22:31 July 07

लिफ्ट न दिल्याने खून करणाऱ्या आरोपीला अटक

लातूर - जिल्ह्यातील देवणी येथे लिफ्ट न दिल्याने वाहधारकाचा दगडाचे ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हेच्या पथकाला घटनेच्या दीड महिन्यानंतर पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळण्यास यथ आले आहे.

20:20 July 07

चौकशीसाठी हजर राहण्याबाबत एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस

मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडी (सक्त वसुली संचालनालय)ने नोटीस बजावली आहे. गुरुवारी (दि. 8 जुलै) त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. यावर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडणार आहेत.

18:18 July 07

बीएचआर घोटाळा : भाजप आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल

जळगाव - राज्यभर गाजत असलेल्या बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी जळगावच्या भाजप आमदारावर गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे विधानपरीषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर फसवणूक, अपहरणाससह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे..

17:10 July 07

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे - नातेवाईक असणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर तिची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. संदीप बळीराम वाघमारे (रा. वरळी), असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 27 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. जानेवारी, 2020 पासून हा प्रकार सुरू होता. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, संदीप वाघमारे हे मुंबई पोलीस दलात मुख्यालयात पोलीस शिपाई पदावर काम करतात. तर तक्रारदार असलेली पीडित तरुणी त्यांच्या नात्यातील आहे. याच ओळखीचा फायदा घेऊन संदीप वाघमारे याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर जानेवारी 2020 ते मे 2021 या कालावधीत त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही काळानंतर त्यांनी आपला विवाह झाला आहे, असे भासवून पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने तक्रारदाराच्या आई-वडिलांकडून अडीच लाख रुपये रोख आणि अडीच तोळे सोने घेत फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

16:41 July 07

पालघर प्रांताधिकारी कार्यालयासमोर मनसेच अर्धनग्न आंदोलन

पालघर - विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाचा दर निश्चित नसल्याने मनसेने प्रांताधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. पालघर तालुका प्रमुख मंगेश घरत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी भूसंपादनाचा दर निश्चित असताना उंबरपाडा आणि इतर दहा गावांचा दर निश्चित नसल्याचा आरोप मंगेश घरत यांनी केला आहे.

16:35 July 07

राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होणार

मुंबई - राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होणार असून याबाबतचे सुधारित आदेश बुधवारी (दि. 7 जुलै) शासनाने काढले आहेत. 

15:32 July 07

अंबरनाथ शहरात पूर्ववैमनस्यातून मित्राची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

ठाणे - अंबरनाथ शहरात पूर्ववैमनस्यातून मित्राची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या. हत्येनंतर आरोपी मित्रांची चौकडी घटनास्थळावरून फरार, शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू.

14:52 July 07

खासदार नारायण राणे, कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळातली वर्णी निश्चित ?

खासदार नारायण राणे, कपिल पाटील यांना तातडीने फोन, केंद्रीय मंत्रिमंडळातली वर्णी निश्चित मानली जात आहे. 

12:44 July 07

नव्याने लावणार कान्होपात्रा झाड; विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय

पंढरपूर - पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी हजारो वर्षांची परंपरा आहे. त्या परंपरेचा एक भाग म्हणून संत कान्होपात्रा यांच्या कान्होपात्रा झाडांची म्हणून ओळख आहे. या झाडाचे दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. मात्र हे झाड शंभर वर्षे जुने झाले आहे, त्यामुळे विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने कान्होपात्रा झाड आता नव्याने लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

12:44 July 07

कृपाशंकर सिंग, यतीन कदम यांचा भाजपा मध्ये प्रवेश

कृपाशंकर सिंग, यतीन कदम यांचा बुधवारी भाजपा मध्ये प्रवेश

माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग आणि नाशिक जिल्ह्यातील युवा नेता यतीन रावसाहेब कदम यांनी आज(बुधवार) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यतीन कदम हे निफाड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र असून नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.

12:28 July 07

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिलीप कुमार यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले

12:27 July 07

नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या बाबतचे शब्द माघारी घेतले

आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून युवासेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. यावर नितेश राणे यांनी आपले ते शब्द माघारी घेत असल्याचे ट्विट केले आहे.

12:09 July 07

नितेश राणेंच्या निषेधार्थ युवासेनेचे निषेध आंदोलन, पुतळा जाळला

मुंबई - आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यानंतर  युवा सेनेकडून राणेंच्या वक्तव्याचा निषेध करत लालबाग, परळ, शिवडी परिसरात निर्दशने करण्यात येत आहेत. भारतमाता सिनेमा समोर निदर्शन करताना युवासेनेच्या कार्यकर्तांनी नितेश राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

11:29 July 07

दिलीप कुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होतील - मुख्यमंत्री ठाकरेंच्या सुचना

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज सकाळी निधन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलीपकुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दिलीप कुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होतील अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.

10:56 July 07

आम्ही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे - संजय राऊत

 महाराष्ट्र सरकारने तीन कृषी विधेयक आणली आहेत ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विधानसभेत त्याला मंजुरी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. तसेच एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक झाली, याबाबत कल्पना नाही. मात्र कारवाया चालूच असतात, अशी प्रतिक्रिया शिवेसना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. 

10:06 July 07

रत्नागिरी - कोकणात रिफायनरीच्या नवीन जागेविरोधात दोन गावांचे ठराव, राजापूर तालुक्यातील सोलगाव, शिवणे खुर्द ग्रामपंचायतीचे ठराव. MIDC, रिफायनरीला विरोध असल्याचा दोन्ही ठरावांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. विरोधाच्या ठरावानंतर समर्थकांच्या भूमिकेकडे लक्ष 

09:32 July 07

एकनाथ खडसे यांच्या जावयास भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीकडून अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. या कारवाईनंतर ईडीने खडसे कुटुंबीयांभोवती कारवाईचा फास आवळला असल्याचे बोलले जात आहे. भोसरी गैरव्यवहार प्रकरणात खडसेंचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचेही नाव आहे. एकूणच ईडीने कारवाईचे पाऊल उचलल्यानंतर खडसेंच्या अडचणीत भर पडली आहे.

08:05 July 07

दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचे निधन

मुंबई - हिंदी सिने सृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज निधन झाले. ते 98 वर्षाचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर उपचार करणारे पल्मोनोलॉजिस्ट डॉ जलील पारकर यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे.

07:18 July 07

विश्रांतीनंतर पुन्हा सांगलीमध्ये पावसाला सुरुवात, शेतकरी काही प्रमाणात सुखावला...

07:05 July 07

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात कोरोनाच्या ८ हजार ४१८ रुग्णांची भर

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 8,418 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 10,548 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच 171 कोरोना बाधितांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरल्याने त्यांचा मृत्यू झाला. राज्यात सध्य स्थितीत एकूण 1 लाख 14 हजार 297 सक्रीय रुग्ण आहेत. तर  58,72,268 उपचारानंतर बरे झाले आहेत. तर एकूण मृताचा आकडा 1,23,531 पोहोचला आहे.

06:09 July 07

ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला पोलीस कोठडी

ठाणे -  भिवंडीमध्ये एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करून १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपीने अत्याचार करताना रोखणाऱ्या पीडितेच्या आईलाही धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Last Updated : Jul 7, 2021, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.