ETV Bharat / city

MAHARASHTRA BREAKING : केंद्रीय सहकार मंत्रालयामुळे राज्याच्या अधिकारांवर गंडातर नाही- शरद पवार

author img

By

Published : Jul 11, 2021, 7:05 AM IST

Updated : Jul 11, 2021, 12:40 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग
महाराष्ट्र ब्रेकिंग

12:38 July 11

१३ जुलैला मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा होणार खंडीत

१३ जुलै रोजी सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत जुहू, विलेपार्ले, सांताक्रूझ, खार, अंधेरीतील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद असेल वा कमी दाबाने होईल. पाणी पुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी हा एक दिवसीय बदल करण्यात येत असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे.

11:03 July 11

मराठा समाजाच्या बाबतीत निर्णय घेण्यास शासनाला लकवा का आहे? -समरजितसिंह घाटगे

मराठा समाजाच्या प्रश्नावर समाजाला दिलेली मुदत उलटून गेली तरी शासनाने यावर काहीच ठोस निर्णय केलेला नाही. मराठा समाजाच्या बाबतीत निर्णय घेण्यास शासनाला लकवा का आहे ? शासनाने मराठा समाजाला गृहीत धरणे बंद करावे, अन्यथा गाठ मराठयांशी आहे, समरजित घाडगे यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा

10:53 July 11

उत्तर महाराष्ट्रसह पुणे साताऱ्यात पावसांचा अंदाज

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे नंदुरबार या भागात दुपारी  १ ते २ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा पुणे जिल्ह्यातही पावसाची शक्यता मुंबईच्या वेधशाळेकडून व्यक्त करण्याता आली आहे.

10:51 July 11

माहिममध्ये अमली पदार्थासह तस्कराला अटक

मुबंई - नार्कोटिक्स विभागाने शनिवारी रात्री अमली पदार्थ तस्काराच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून मोठ्याप्रमाणात अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले आहे.

10:15 July 11

लोण्यावळ्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी

पुणे - कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने पर्यटकांनी लोणावळा खंडाळ्याची वाट धरली आहे. लोणावण्यातील अनेक पर्यटन स्थळांवर पर्टकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यावेळी बहुसंख्य पर्यटक हे विनामास्कच पर्यटनाचा आनंद लुटताना दिसून येत आहे.

08:50 July 11

हिंगोली जिल्ह्यात पागरा शिंदे गावाला भूकंप सदृश्य धक्के ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

07:15 July 11

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात करणार पक्ष कार्यालायचे उद्घाटन

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. आज (रविवारी) ते पुण्यातील मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने तयारी सुरू केली आहे.

06:40 July 11

मुंबई - जुहूमध्ये एका २३ वर्षीय रिक्षा चालकाने १६ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्या विरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

06:37 July 11

दहिसरमध्ये भिंत कोसळून १२ वर्षीय मुलगा जखमी

मुंबई - दहिसर परिसरात घराची भिंत कोसळून १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

06:28 July 11

मुंबईतील मीरा रोड येथे हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर धाड; एकास अटक

मुंबई- मुंबई पोलिसांच्या सामाजिक गुन्हे शाखा विभागाने मिरा रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर धाड टाकली. या कारवाईत एाकास अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. 

Last Updated : Jul 11, 2021, 12:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.