ETV Bharat / city

BREAKING : महाविकास आघाडीचा बंद : राज्यात चोख बंदोबस्त - arayan khan and NCB

नायजेरीन व्यक्तीला 39 लाखाच्या MDMA ड्रग्जसह केले अटक

author img

By

Published : Oct 10, 2021, 6:48 AM IST

Updated : Oct 10, 2021, 10:01 PM IST

22:00 October 10

महाविकास आघाडीचा बंद : राज्यात चोख बंदोबस्त

महाविकास आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे मुंबई पोलिासंनी म्हटले आहे. महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. एसआरपीएफच्या तीन तुकड्या, होम गार्डचे 500 जवान आणि स्थानिक शस्त्र शाखेचे 700 जवान तैनात करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

17:09 October 10

ड्रग्स पार्टी प्रकरण : ड्रग पेडलर शिवराज रामदासला सोमवारपर्यंत एनसीबी कोठडी

अरबाझ मर्चंटसोबत लिंक असल्याचा संशय असलेला ड्रग पेडलर शिवराज रामदास याला सोमवारपर्यंत एनसीबी कोठडीत पाठविण्यात आले आहे.

14:12 October 10

मध्ये रशियामध्ये विमान अपघातात 15 जण ठार, 23 जण करत होते प्रवास

मध्य रशियामध्ये आज सकाळी 9.24 मिनिटांच्या सुमारास एक विमान क्रॅश झाले. या विमानात एकूण 23 जण प्रवास करत होते. या अपघातामध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 7 जणांना रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती तिथल्या आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. 

14:05 October 10

पुष्पक एक्सप्रेस दरोडा आणि सामूहिक बलात्कार प्रकरणी रेल्वे पोलिसांनी केली आणखी एकाला अटक

पुष्पक एक्सप्रेस दरोडा आणि सामूहिक बलात्कार प्रकरणी रेल्वे पोलिसांनी केली आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. आता पर्यंत या केसमध्ये सात जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी याबाबतची माहिती दिली.

13:59 October 10

क्रुझ ड्रग्ज प्रकरण : एनसीबीचा मुंबईतील गोरेगावात छापा, दोघे ताब्यात औषधे जप्त

मुंबई एनसीबीने शनिवारी रात्री गोरेगाव परिसरात छापा टाकला, 

या छाप्यात २ जणांना ताब्यात घेऊन एनसीबी कार्यालयात आणण्यात आले.

या छाप्यादरम्यान काही प्रमाणात औषधेही जप्त करण्यात आली आहेत.

क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणानंतर हे छापे टाकण्यात आले आहेत.

रात्री उशिरापासून छापेमारी सुरू होती, एनसीबीने सांताक्रूझ भागातून एका औषध विक्रेत्याला अटक केली आहे

12:20 October 10

-एनसीबीने चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांना पुन्हा समन्स बजावले

-नसीबीने चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांना पुन्हा समन्स बजावले आहे. आता सोमवारी पुन्हा चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले आहे. क्रुझ ड्रग्ज प्रकरणात शनिवारीही NCB ने इम्तियाज खत्रीची केली होती 8 तास चौकशी

10:46 October 10

सांताक्रुझमध्ये गरबा नाईटचे आयोजन, कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल

गरबा नाईटचा व्हिडिओ मुंबईच्या सांताक्रूझ भागात असलेल्या एका मॉलमध्ये समोर आला.

कोरोना नियमांनुसार बीएमसीने दांडिया किंवा गरबा आयोजित करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

हा कार्यक्रम हायलाईफ मॉल, सांताक्रूझ येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात 150 हून अधिक लोक उपस्थित होते ... व्हिडिओमध्ये कोणाच्याही चेहऱ्यावर मास्क दिसत नाहीत

व्हिडिओच्या आधारे ... पोलिसांनी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये गरबा नाईटच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला

शुक्रवारी गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले होते

08:29 October 10

अमलीपदार्थ विरोधी पथकाने एका नायजेरीयन व्यक्तीला 39 लाखाच्या MDMA ड्रग्जसह केले अटक

08:23 October 10

इंधनाच्या दरात आणखी वाढ, पेट्रोल प्रतिलिटर 30 पैसे तर डिझेल 35 पैशांनी महागले

पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. डिझेलमध्ये प्रतिलिटर 35 पैशाची वाढ झाली आहे, तर पेट्रोलच्या दरात 30 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर 104.14 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलसाठी आता प्रतिलिटरला 110.12 रुपये मोजावे लागणार आहेत आणि डिझेलला 100.66 प्रतिलिटरसाठी द्यावे लागणार आहेत.

06:19 October 10

BIG Breaking

मुंबई -  अमलीपदार्थ विरोधी पथकाने एका नायजेरीन व्यक्तीला 39 लाखाच्या ड्रग्जसह अटक केली आहे. त्याच्याकडे 13 ग्राम MDMA  आढळून आले.

Last Updated : Oct 10, 2021, 10:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.