ETV Bharat / city

Corona Update : राज्यात शनिवारी ९ हजार ४८९ नवीन कोरोनाबाधित; ८ हजार ३९५ कोरोनामुक्त - महाराष्ट्र कोरोना न्यूज

शनिवारी राज्यात ९ हजार ४८९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच दिवसभरात ८ हजार ३९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

corona
कोरोना
author img

By

Published : Jul 3, 2021, 10:34 PM IST

मुंबई - राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. शनिवारी राज्यात ९ हजार ४८९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच दिवसभरात ८ हजार ३९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात मागील काही दिवसांमध्ये सातत्याने कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत होती. राज्यात शनिवारी १५३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

हेही वाचा - 'कयामत से कयामत तक' म्हणणाऱ्या फिल्मी हिरोचा पहिला विवाह टिकला 16, तर दुसरा 15 वर्षे

  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२३,२०,८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,८८,८४१ (१४.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,३२,९४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजच्या १५३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ४५ हजार ३१५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के एवढे झाले आहे.

  • लसीकरणाची सर्वोच्च आकडेवारी -

शनिवारी दिवसभरात राज्यात ७ लाख ९६ हजार ७३८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे.

हेही वाचा - अनिल देशमुख दिल्लीला गेलेच नाहीत अन् त्यांना तिसरा समन्सही मिळाला नाही - अ‌ॅड. इंद्रपाल सिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.