ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात आज ११ हजार 877 कोरोना पॉझिटिव्ह, तर ओमायक्रॉनच्या 50 रुग्णांची भर - महाराष्ट्रात ओमायक्रॉन वाढला

आज दिवसभरात राज्यात 11 हजार 877 नवीन ( Todays Corona Patient Number In Maharashtra ) कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनच्या ५० नव्या ( New omicron Patient ) रुग्णांची भर पडली आहे.

todays corona patient numbers in maharashtra

author img

By

Published : Jan 2, 2022, 9:39 PM IST

मुंबई - काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या ( Corona Patient Increasing ) झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 11 हजार 877 नवीन ( Todays Corona Patient Number In Maharashtra ) कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनच्या ५० नव्या ( New omicron Patient ) रुग्णांची भर पडली आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

  • #COVID19 | Maharashtra reports 11,877 new cases, 2,069 recoveries, and 9 deaths today. Active cases stand at 42,024

    50 patients with Omicron infection have been reported in the state today, a total of 510 Omicron cases have been reported in Maharashtra. pic.twitter.com/WkkPHX2Z9I

    — ANI (@ANI) January 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यात आज 11 हजार 877 रुग्णांचे निदान -

राज्यात कोरोनासह नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यात झपाट्य़ाने वाढत आहेत. मागील चार-पाच दिवसांपासून या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाची यामुळे चिंता वाढली आहे. राज्यात आज 11 हजार 877 रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 66 लाख 99 हजार 868च्या घरात पोहचली आहे. तर 2069 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 12 हजार 610 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.21 टक्के इतका आहे. आज दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 6 कोटी 92 लाख 59 हजार 618 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 9.67 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 43 हजार 250 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 1091 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. दरम्यान, सद्यस्थितीत एकूण 42 हजार 024 रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ओमायक्रॉनचे आतापर्यंत 510 रुग्ण

राष्ट्रीय विज्ञान संस्था आणि एनसीसीएस केलेल्या अहवालानुसार राज्यात ओमायक्रॉनचे 50 नव्या रुग्णांचे निदान झाले. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण पुणे मनपा 34 भागातील आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये 8, पुणे ग्रामीण 2, ठाणे आणि मुंबई अनुक्रमे 1 रुग्ण सापडला आहे. ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या यामुळे 510 झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

आजपर्यंत 2284 प्रवाशांची जनुकीय चाचणीसाठी नमुने -

1 डिसेंबरपासून आजपर्यंत 2 लाख 17 हजार 836 प्रवासी मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळावर उतरले. एकूण 47 हजार 913 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अतिजोखमीच्या देशातील 286 आणि इतर देशातील 160 अशा एकूण 446 जणांची आरटीपीसीआर, तर आजपर्यंतच्या 2284 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 134 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित असल्याचेही आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

  • मुंबई महापालिका - 7792
  • ठाणे पालिका - 153
  • ठाणे मनपा - 617
  • नवी मुंबई पालिका - 559
  • कल्याण डोबिवली पालिका - 260
  • वसई विरार पालिका - 261
  • नाशिक - 36
  • नाशिक पालिका - 69
  • अहमदनगर - 55
  • अहमदनगर पालिका - 30
  • पुणे - 156
  • पुणे पालिका - 530
  • पिंपरी चिंचवड पालिका - 166

ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई - 328
  • पुणे मनपा - 49
  • पिंपरी चिंचवड - 36
  • पुणे ग्रामीण - 23
  • ठाणे मनपा - 13
  • नवी मुंबई, पनवेल - 8
  • कल्याण - डोंबिवली - 7
  • नागपूर, सातारा - 6
  • उस्मानाबाद - 5
  • वसई-विरार - 4
  • नांदेड - 3
  • औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी-निजामपूर मनपा, मीरा भाईंदर, सांगली - प्रत्येकी 2
  • लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर - प्रत्येकी 1

हेही वाचा - Pune Corona Update : चिंता वाढली! पुण्यात आज 524 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 79 रुग्णांना डिस्चार्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.