मुंबई - राज्यात शुक्रवारी ५ हजार ५३९ रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात वाढ होऊन ६ हजार ६१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी १८७ मृत्यूंची नोंद झाली होती, आज त्यात घट होऊन १२८ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात गेले काही दिवस रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढ उतार दिसून येत आहे. राज्यात आज ९,३५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
९,३५६ रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात आज ९,३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण ६१,३९,४९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७२ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६,०६१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १२८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३३,८४५ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९३,७२,२१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,४७,८२० (१२.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,३१,५३९ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७१,०५० सक्रिय रुग्ण आहेत.
मृत्यूदर २.१ टक्के -
१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
रुग्णसंख्येत चढउतार -
राज्यात मागील महिन्यात १, ६ आणि १८ जुलै रोजी कोरोना विषाणूच्या सर्वाधिक ९ हजार रुग्णांची तर १९ जुलै रोजी ६०१७ रुग्णांची नोंद झाली. रविवारी रुग्णसंख्येत किंचित घट होऊन ६,४७९ रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी त्यात घट होऊन ४,८६९ रुग्ण आढळून आले. मंगळवारी त्यात वाढ होऊन ६ हजार ५ तर बुधवारी ६ हजार १२६ नव्या रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी त्यात आणखी वाढ होऊन ६ हजार ६९५ नव्या रुग्णांची नोंद झाली. काल शुक्रवारी त्यात घट होऊन ५ हजार ५३९ रुग्णांची नोंद झाली. आज शनिवारी त्यात वाढ होऊन ६ हजार ६१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
- मुंबई - ३३२
- रायगड - १००
- नाशिक - ६८
- अहमदनगर - ७५७
- पुणे - ५३५
- पुणे पालिका - २११
- पिपरी चिंचवड पालिका - १५१
- सोलापूर - ५४८
- सातारा - ८४५
- कोल्हापूर - ३५५
- कोल्हापूर पालिका - ८४
- सांगली - ७२५
- सिंधुदुर्ग - १३०
- रत्नागिरी - २७१
- बीड - १४९
मागील काही दिवसातील रुग्णसंख्या -
- 7 ऑगस्ट - 6061 नवे रुग्ण
- 6 ऑगस्ट - 5539 नवे रुग्ण
- 5 ऑगस्ट - 6695 नवे रुग्ण
- 4 ऑगस्ट - 6126 नवे रुग्ण
- 3 ऑगस्ट - 6005 नवे रुग्ण
- 2 ऑगस्ट - 4869 नवे रुग्ण
- 1 ऑगस्ट - 6479 नवे रुग्ण
- 31 जुलै - 6959 नवे रुग्ण
- 30 जुलै - 6600 नवे रुग्ण
- 29 जुलै - 7242 नवे रुग्ण
- 28 जुलै - 6857 नवे रुग्ण
- 27 जुलै - 6258 नवे रुग्ण
- 26 जुलै - 4877 नवे रुग्ण
- 18 जुलै - 9000 नवे रुग्ण
- 7 जुलै - 9558 नवे रुग्ण
- 5 जुलै - 6740 नवे रुग्ण
- 4 जुलै - 9336 नवे रुग्ण
- 3 जुलै - 9489 नवे रुग्ण
- 1 जुलै - 9195 नवे रुग्ण