ETV Bharat / city

आज.. आत्ता... (सोमवार २४ जून, सकाळी ९ पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या) - news bulletin

मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला 'डिफॉल्टर' यादीत: मंत्र्यानी महापालिकेच्या पाणी बिलाचे ८ कोटी रुपये थकवले...उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका, धनंजय मुंडेंचा टोला...मुंबईत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या 2 बुकींना अटक...रायगडमध्ये काशीद बीचवर पोहण्यास गेलेल्या 2 पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू...वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या झिनत अमान, आता पडद्यावर करणार पुनरागमन...

आज.. आत्ता... (सोमवार २४ जून, सकाळी ९ पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या)
author img

By

Published : Jun 24, 2019, 9:03 AM IST

मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला 'डिफॉल्टर' यादीत: मंत्र्यानी महापालिकेच्या पाणी बिलाचे ८ कोटी रुपये थकवले

मुंबई - पाणी बिल वेळेवर भरले नाही तर सामान्य नागरिकांचे पाणी कापणाऱ्या महापालिकेचे राज्याच्या मंत्र्यांनी तब्बल ८ कोटी रुपयांचे पाणी बिल थकवले आहे. त्यात मुख्यमंत्री राहत असलेल्या वर्षा बंगल्याचाही समावेश आहे. वर्षा बंगल्याचे ७ लाख ४४ हजार ९८१ रुपयांचे पाणी बिल थकीत असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. वाचा सविस्तर

उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका; धनंजय मुंडेंचा टोला
पुणे - शिवसेनेला निवडणुकीच्या तोंडावरच पीकविमा कंपन्यांची कार्यालये बंद करण्याचे सुचत आहे. गेल्या ५ वर्षापासून या कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत, मात्र शिवसेनेला हे आत्ताच दिसले का? असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका, असा टोलाही मुंडेंनी ठाकरेंना लगावला आहे. वाचा सविस्तर

मुंबईत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या दोन बुकींना अटक
मुंबई - इंग्लडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेटच्या मॅचवर सट्टा चालवणाऱ्या दोन बुकींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ग्रांट रोड येथील बलवास हॉटेलमध्ये शनिवारी ही कारवाई केली. वाचा सविस्तर

रायगडमध्ये काशीद बीचवर पोहण्यास गेलेल्या दोन पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू
रायगड - मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रात पोहण्यास गेलेले 2 जण बुडल्याची घटना सायंकाळी घडली. सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तीन पर्यटक काशीद समुद्र किनाऱ्यावर आले होते. यावेळी ते पोहण्यासाठी समुद्रामध्ये उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले. अभिषेक म्हात्रे (32, रा. पनवेल), पूजा शेट्टी (वय- 28 रा. कोपर खैरणे) असे बुडालेल्या दोघांची नावे आहेत. वाचा सविस्तर

वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या झिनत अमान, आता पडद्यावर करणार पुनरागमन
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री झिनत अमान बऱ्याच दिवसांपासून लाईमलाईट पासून दुर होत्या. लवकरच त्या आशुतोष गोवारिकर यांच्या 'पानीपत' चित्रपटातून कमबॅक करत आहेत. या चित्रपटात त्यांची छोटी भूमिका असणार आहे. मात्र, बऱ्याच काळानंतर त्यांना पडद्यावर पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांना त्यांच्या भूमिकेची उत्सुकता आहे. झिनत या तब्बल ३० वर्षानंतर आशुतोष यांच्यासोबत काम करत आहेत. या चित्रपटात त्या 'सकीना बेगम'ची भूमिका साकारणार आहे. वाचा सविस्तर

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.