ETV Bharat / city

मान्सून केरळमध्ये दाखल...!

author img

By

Published : Jun 3, 2021, 9:37 AM IST

Updated : Jun 3, 2021, 1:24 PM IST

Big Breaking
Big Breaking

13:23 June 03

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षा रद्द करण्यासंदर्भात महत्वाची बैठक सुरू

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाची बैठक सुरू आहे. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय होऊ शकतो.

13:14 June 03

सीरमने डीसीजीआयकडे मागितली स्पुटनिक-व्ही लस निर्मितीची परवानगी

मुंबई - सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने रशियाच्या स्पुटनिक-व्ही या लस निर्मिती संदर्भात भारताच्या औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआई) परवानगी मागीतली आहे. सध्या देशात हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीज मध्ये  रशियाची स्पुटनिक व्ही ही लस निर्माण केली जात आहे. 

12:11 June 03

मान्सून केरळात दाखल

मान्सूनचा पाऊस आज केरळच्या दक्षिण भागात दाखल झाला आहे. पुढील चार ते पाच दिवसात कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीभागात मान्सूनचे दमदार आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

11:50 June 03

मी धडा घेतलाय, आपला मोबाईल दुसऱ्याकडे देऊ नका - महापौर

बीकेसीमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी माझा मोबाईल दुसऱ्याकडे होता. माझ्या मोबाईलला लॉक नसते  त्यावेळी कोणत्यातरी शिवसैनिकांने ते वादग्रस्त ट्विट केले होते. त्यानंतर या प्रकारची माहिती माझ्या लक्षात येताच मी मोबाईल घेतला आणि ते ट्विट डिलीट केले. तसेच त्या मुलाला मी समज दिला असल्याचे स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांनी दिले. तसेच मी धडा घेतला आहे, की आपला मोबाईल दुसऱ्याकडे देऊ नये असा सल्लाही पेडणेकर यांनी दिला आहे.

11:41 June 03

भारत-पाक सीमेवर जवानांनी केले ५४ किलो अमलीपदार्थ जप्त

राजस्थानमध्ये बिकानेरच्या खाजूवालास लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय भारत-पाक सीमेवर बुधवारी मध्यरात्री अमली पदार्थ तस्करीचा डाव उधळला गेला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरून जवळपास 54 किलो हेरॉईन तस्करी केली जात होती.  पाकिस्तानातील दोन तस्करांनी भारतीय सीमेत घुसखोरी करत भारतातील तस्करांकडे ते  सुपुर्द करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बीएसएफच्या जवानांनी सुचना देऊन फायरिंग केली. त्यावेळी दोन्ही बाजुचे तस्कर फरार झाले. या कारवाईत जवनांनी ५४ किलो हेरॉईन जप्त केले,

11:02 June 03

१२ कोटी लस आणणार कुठून? प्रियांका गांधींचा केंद्राला सवाल

मे महिन्यात लसीची उत्पादन क्षमता 8.5 कोटी होती. लसीचे उत्पादन झाले 7.94 कोटी. त्यातून 6.1 कोटी लसीकरण पूर्ण झाले. सध्या सरकारकडून दावा केला जात आहे, की जून महिन्यात 12 कोटी लसीचे डोस उपलब्ध होतील.. मग मे महिन्याची आकडेवारी पाहता हे कोठून उपलब्ध होणार आहेत? की भारतातील दोन्ही लस निर्मात्या कंपन्यांची उत्पादन क्षमता 40% वाढली आहे का? तसेच लसीकरणाचे 35000 कोटीचा निधी कुठे खर्च केला असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सरकारला केला आहे.

09:07 June 03

लसीमुळे नुकसान झाल्यास त्या प्रकरणी होणाऱ्या कायदेशीर बाबींपासून सुरक्षा देण्याची मागणी

मॉडर्ना, फायझर या लस निर्माण कंपन्यांनी देखील लशीं संदर्भात कायदेशीर नुकसान भरपाई प्रकरणातून भारत सरकारकडून सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. सीरम इंन्स्टिट्युटकडूनही अशा प्रकारची सुरक्षा हमी देण्याची मागणी केली आहे. 

Last Updated : Jun 3, 2021, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.