मुंबई - अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिला आहे. भाजप युवा मोर्चाच्यावतीने आज दादर येथील शिवसेना भवनवर फटकार मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेना भवनवर मोर्चा काढणं कितपत योग्य याचंही उत्तर द्यावं, शिवसेना भवन येथील श्रद्धास्थानासमोर भाजपच्या कोणत्यातरी एका पोरानं उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. तो शिवसैनिकांनी हाणून पाडला आहे. तुम्ही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसेल का? अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिली आहे.
अंगावर याल तर शिंगावर घेऊच; महापौर किशोरी पेडणेकर यांचा भाजपला इशारा
17:44 June 16

17:28 June 16
भाजपचा शिवसेना भवनावर फटकार मोर्चा
मुंबई : मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढला. अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला . भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र, शिवसेना आमदार सदा सरवणकर हे शिवसैनिकांसह सेनाभवन परिसरात दाखल झाल्याने
15:30 June 16
पाश्चिमात्य नृत्यसंस्कृती बॉलिवूडमध्ये आणणारे ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांचे निधन
मुंबई - जवळपास २५० चित्रपटांतून काम केलेले बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांचे वयाच्या ९७व्या वर्षी निधन झाले. ते काही काळ आजारी होते. त्यांचे बुधवारी सकाळी आपल्या निवासस्थानीच निधन झाले. त्यांचे पुत्र प्राध्यापक अशोक चंद्रशेखर म्हणाले की ‘मुंबईच्या विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्या गुरुवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते आणि एका दिवसाने त्यांना घरीसुद्धा आणले होते. त्यांच्यासाठी आम्ही ऑक्सिजनसह सर्व सुविधा तयार ठेवल्या होत्या. अगदी काल रात्रीपर्यंत ते ठीक होते. त्यांचा शेवट झोपेतच आणि शांततापूर्ण झाला.’
15:25 June 16
राज्यपालांच्या हस्ते होणार राजभवन पोलीस कॅन्टीनचे उद्घाटन
मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी ११.३० वाजता राजभवन निवासी संकुल येथे पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित राहणार आहेत.
11:58 June 16
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बरोबर बैठक घेऊया, आम्ही छत्रपती संभाजीराजेंच्या बरोबर आहोत - आमदार प्रकाश आबिटकर
11:25 June 16
मराठा समाज प्रतिनिधींकडून आरक्षणासंदर्भात मागण्या सादर
कोल्हापुरात मराठा मूक आंदोलन सुरू
09:58 June 16
युवराज संभाजीराजे छत्रपती मराठा मूक आंदोलन स्थळी दाखल
आंदोलन स्थळी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, भाजपा नेते चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने यांचीही उपस्थिती
09:11 June 16
मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात; शहरातील सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात
07:39 June 16
भारतीय जवानांनी केला एका दहशतवाद्याचा खात्मा
श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवनांना यश आले आहे; जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती जम्मू-कश्मीरच्या पोलिसांनी दिली
06:09 June 16
कोल्हापूरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होणार
मराठा आरक्षणप्रश्नी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने ठोस भूमिका जाहीर करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. तसेच मराठा समाजाकडून राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र हे आंदोलन लोकशाहीच्या मार्गानेच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा, असे आवाहन या मोर्चापूर्वी करण्यात आले आहे.