ETV Bharat / city

संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट - संजय राऊत लेटेस्ट न्यूज

खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेलतली आहे. या भेटीदरम्यान राज्यातील कोरोना परिस्थिती आणि राजकीय परिस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट
संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट
author img

By

Published : May 8, 2021, 9:53 PM IST

मुंबई- खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेलतली आहे. या भेटीदरम्यान राज्यातील कोरोना परिस्थिती आणि राजकीय परिस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली. ही भेट शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी झाली असून, शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी संजय राऊत हे त्यांच्या निवासस्थानी गेले असल्याची माहिती संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली.

राज्यातील घडमोडिंवर चर्चा

गेल्या महिन्यात शरद पवार यांच्यावर पित्ताशयाच्या त्रासामुळे दोन शस्त्रक्रिया तर तोंडाचा अल्सर काढण्यासाठी एक शात्रक्रिया अशा एकूण तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रियेनंतर शरद पवार हे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांच्या निवासस्थानी आराम करत होते. मात्र कालपासून शरद पवार यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. कालपासून त्यानी लोकांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. तसेच काल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र देखील लिहिले होते. हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिकांना विजेच्या बिलातून सवलत मिळावी अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली होती. आज संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज्यातील एकूण राजकिय परिस्थिती आणि कोरोना परिस्थितीबाबत त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा - सोलापुरात उलटला मासे नेणारा ट्रक, मासे उचलण्यासाठी उडाली नागरिकांची झुंबड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.