मुंबई - आज राज्यात 3451 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 52 हजार 253 वर पोहचला आहे. तर, आज 30 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 390 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.7 टक्के तर मृत्यूदर 2.50 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा - पोलिसाची हत्या करणाऱ्या दारू माफियाचा एन्काऊंटर! उत्तर प्रदेशात रंगला थरार
आज 2421 रुग्ण बरे -
राज्यात आज 2421 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 63 हजार 946 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 51 लाख 08 हजार 645 नमुन्यांपैकी 20 लाख 52 हजार 253 नमुने म्हणजेच 13.58 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 65 हजार 992 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 35 हजार 633 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
हेही वाचा - भंडारा जळीतकांड : आगीचे रिपोर्ट दोन दिवसात मिळणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.