मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांच्या घरात आहे. 24 फ्रेब्रुवारीपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी राज्यात नव्या 10 हजार 187 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 90 हजारांच्यां पार पोहोचली आहे.
हेही वाचा - 'आई मला माफ कर, तुझी लाडकी...' पत्र लिहून क्लासवन महिला अधिकाऱ्याची आत्महत्या
शनिवारी 6 हजार 80 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात शनिवारी 6 हजार 80 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 20 लाख 62 हजार 031 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.36 टक्के आहे. राज्यात नव्या 10 हजार 187 रुग्णांची नोंद झाली असून, 24 तासांत राज्यात 47 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 22 लाख 08 हजार 586 वर पोहोचली आहे. राज्यात जवळपास 4 लाख 28 हजार 676 जण होम क्वारंटाईन आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजार 897 इतकी असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे.
हेही वाचा - अभिनेत्री सुलोचना लाटकर दादासाहेब फाळके पुरस्कारापासून वंचित का? सरकारला सवाल
कोणत्या भागात किती नव्या रुग्णांची नोंद -
मुंबई महानगरपालिका क्षेत्र- 1188
ठाणे- 109
ठाणे महानगरपालिका क्षेत्र- 222
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र- 177
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र- 223
नाशिक- 126
नाशिक महापालिका क्षेत्र- 334
अहमदनगर- 230
जळगाव - 337
जळगाव महापालिका क्षेत्र- 281
पुणे-402
पुणे महानगरपालिका क्षेत्र- 991
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र-532
सातारा -185
औरांगाबाद मनपा-326
जालना -123
बीड- 107
नांदेड मनपा -117
अकोला -163
अकोला मनपा - 178
अमरावती -227
अमरावती महानगरपालिका क्षेत्र- 317
यवतमाळ -197
बुलडाणा -186
वाशिम -247
नागपूर-285
नागपूर महानगरपालिका क्षेत्र- 932
वर्धा- 213
हेही वाचा - आरोपपत्र रियाला अडकवण्यासाठी तयार केले गेलेले - वकील