मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. सोमवार, मंगळवारी या दोन दिवसात पाचशेच्या घरात रुग्ण आढळून आले. काल बुधवारी त्यात वाढ होऊन 830 रुग्ण आढळून आले होते. आज पून्हा रुग्णसंख्या कमी होऊन 666 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून 741 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून तो 734 दिवसांवर पोहचला आहे.
- रुग्ण दुपटीचा कालावधी 734 दिवसांवर -
मुंबईत आज 666 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 19 हजार 179 वर पोहचला आहे. आज 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 247 वर पोहचला आहे. आज 741 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 86 हजार 866 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 14 हजार 807 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 734 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 18 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 81 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 29 हजार 309 तर आतापर्यंत एकूण 66 लाख 23 हजार 219 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
- रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -
1 मे ला 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662, 4 मे ला 2554, 5 मे ला 3879, 6 मे ला 3056, 7 मे ला 3039, 8 मे ला 2678, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 11 मे ला 1717, 12 मे ला 2116, 13 मे ला 1946, 14 मे ला 1657, 15 मे ला 1447, 16 मे ला 1544, 17 मे ला 1240, 18 मे ला 953, 19 मे ला 1350, 20 मे ला 1425, 21 मे ला 1416, 22 मे ला 1299, 23 मे ला 1431, 24 मे ला 1057, 25 मे ला 1037, 26 मे ला 1362, 27 मे ला 1266, 28 मे ला 929, 29 मे ला 1048, 30 मे ला 1066, 31 मे ला 676, 1 जून ला 831, 2 जूनला 925, 3 जून ला 961, 4 जून ला 973, 5 जून ला 866, 6 जून ला 794, 7 जून ला 728, 8 जून ला 673, 9 जून ला 788, 10 जून ला 660, 11 जून ला 696, 12 जून ला 733, 13 जून ला 700, 14 जून ला 529, 15 जूनला 575, 16 जून ला 830, 17 जून ला 666 नवे रुग्ण आढळून आले आहेत.