ETV Bharat / city

राज्यात ५,०११ नवीन रुग्णांचे निदान, १०० रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना मृत्यू न्यूज

राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच मृत्यूचा दरही घटत असल्याने ही दिलासादायक बाब आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७५ टक्के एवढे झाले आहे.

mh corona
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Nov 18, 2020, 8:25 PM IST

मुंबई - आज राज्यात ५,०११ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ लाख ५७ हजार ५२० वर पोहोचला आहे. राज्यात आज १०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६,२०२ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्केवर आला आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज ६,६०८ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १६ लाख ३० हजार १११ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज १०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण १०० मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे आठवड्यातील तर २३ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीचे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९९ लाख ८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ५७ हजार ५२० नमुने म्हणजेच १७.७५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ७ लाख ५०हजार ९९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये तर ५ हजार ३५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण ८० हजार २२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कधी किती रुग्ण आढळून आले -
राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५ तर १७ नोव्हेंबरला २,८४० रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.