ETV Bharat / city

Legislative council election : विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, निवडणूक बिनविरोध होणार? - विधान परिषद निवडणूक उमेदावरी अर्ज

आज विधान परिषदेच्या निवडणुकीत ( Legislative Council candidature application ) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून, दुपारी तीन वाजेपर्यंत ( Legislative Council election 2022 ) अर्ज मागे घ्यावे लागणार आहेत. मात्र, अद्याप तरी कोणत्याही पक्षाकडून ( Legislative Council election ) अर्ज मागे घेण्याबाबत हालचाली सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे, विधान परिषदेचा देखील आखाडा राज्यसभा निवडणुकीप्रमाणे रंगणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Legislative Assembly
Maharashtra Legislative Assembly
author img

By

Published : Jun 13, 2022, 11:43 AM IST

मुंबई - राज्यसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित निकाल आल्यामुळे महाविकास आघाडी ( Maha vikas Aghadi ) चिंतेत आहे. तर, भारतीय जनता पक्षाचा (BJP) आत्मविश्वास बळावला आहे. त्यातच 20 जूनला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेकडून प्रत्येकी दोन उमेदवार देण्यात आले आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाच उमेदवार आणि अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांना भाजपने पाठिंबा दिला असून, या निवडणुकीत दहा जागांसाठी 12 उमेदवार विधानपरिषदेच्या निवडणुकीत रिंगणात असणार आहेत. आज विधान परिषदेच्या निवडणुकीत ( Legislative Council candidature application ) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून, दुपारी तीन वाजेपर्यंत ( Legislative Council election 2022 ) अर्ज मागे घ्यावे लागणार आहेत. मात्र, अद्याप तरी कोणत्याही पक्षाकडून ( Legislative Council election ) अर्ज मागे घेण्याबाबत हालचाली सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे, विधान परिषदेचा देखील आखाडा राज्यसभा निवडणुकीप्रमाणे रंगणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - धक्कादायक..! पुण्यात खासगी बस चालकाने अपहरण करत महिलेवर केला बलात्कार

राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आणि लहान पक्ष सोबत असून आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास महाविकास आघाडीला होता. मात्र, अपक्ष आमदारांनी आपल्या सोबत दगाफटका केल्याचा आरोप शिवसेनेकडून केला गेला. आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे आपले प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ आहे. मात्र काँग्रेसकडे तेवढे संख्याबळ नाही. काँग्रेस आमदारांच्या मतदानावर केवळ एक काँग्रेस उमेदवार निवडून येऊ शकतो. दुसऱ्या उमेदवारासाठी जवळपास दहा मतांची जुळवाजुळव काँग्रेसला करावी लागणार आहे. त्यासाठी राज्यसभेत ज्याप्रमाणे शिवसेनेला अपक्ष आणि लहान गटाची मनधरणी करावी लागली होती, त्याचप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत आता काँग्रेसला लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांची मनधरणी करावी लागणार आहे. मात्र, राज्यसभा निवडणुकीचा अनुभव बघता काँग्रेसला आता अधिक सावधगिरी बाळगावी लागेल.

शिवसेना काँग्रेसवर नाराज? - राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी आपली सर्व 44 मते राज्यसभा उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना दिले असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबाबत शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे, विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपापल्या ताकदीनुसार पाहून घ्यावे, असा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, विधानपरिषदेच्या निवडणुकीची वाट काँग्रेससाठी सध्यातरी खडतर वाटते.

भाजप आणि काँग्रेस उमेदवार मागे घेणार का? - आज विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज मागे न घेतला गेल्यास निवडणूक होणार हे निश्चित आहे. मात्र, राज्यसभेमध्ये मिळालेल्या यशामुळे भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास बळावला आहे. त्यामुळे, विधानपरिषदेच्या निवडणुकात आम्ही पुन्हा एकदा चमत्कार करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात येतोय. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष उमेदवार अर्ज मागे घेईल का? याची शक्यता कमी वाटते. मात्र, अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांना भारतीय जनता पक्षाकडून अर्ज मागे घेण्याच्या सूचना मिळतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

तसेच काँग्रेसने देखील आपले दोन्ही उमेदवार जिंकून आणण्यासाठी जुळवाजुळव पूर्ण केली आहे. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विधानपरिषदेच्या निवडणुकीत जिंकून येतील, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार आणि नेते भाई जगताप यांनी व्यक्त केला. दोन्ही गोटातून आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही तर विधान परिषदेच्या निवडणूक देखील होण्याचे संकेत नक्कीच आहेत.

हेही वाचा - काळजी घ्या ! मुंबईत सलग सहा दिवस समुद्राला मोठी भरती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.