मुंबई - मुख्य निवडणूक आयुक्त, भारत निवडणूक आयोग यांची विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी व नियोजन बघण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या उपस्थितीत विविध उपक्रमांबाबत बैठक सुरू आहे. आज सायकाळी ५ वाजता विविध कार्यक्रमांचे उद्घाटन सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे होणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, गृह विभागाचे प्रधान सचिव आणि राज्य शासनाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आज आगामी निवडणुकी संदर्भात निवडणूक आयोगाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा आणि संदीप सक्सेना, उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन आणि चंद्र भूषण कुमार, महासंचालक धीरेंद्र ओझा, संचालक ( वित्त ) विक्रम बात्रा, पीआयबीच्या अतिरिक्त महासंचालक शेफाली शरण, सचिव ए . एन . दास आणि अवर सचिव आय . सी . गोयल आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे.
या उपक्रमांचे होणार उद्धाटन -
मतदार जागृती वाहनांला झेंडी दाखवून उद्घाटन
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मोबाईल व्हॅन चे उद्घाट
पोस्ट तिकिट आणि टपाल कव्हरचे प्रकाशन
कॉफी टेबल बुक चे प्रकाशन
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे लिखित पुस्तकाचे प्रकाशन
प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित अभिनित मतदार जागृती चित्रफीतीचे उद्घाटन