ETV Bharat / city

राज्यात आज २४ हजार २८२ जणांचे कोरोना लसीकरण - महाराष्ट्र लसीकरण अपडेट

राज्यात आज २९० केंद्रांवर २४ हजार २८२ (८३ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात आज सर्वात जास्त गोंदीया जिल्ह्यात १४३ टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ गडचिरोली, वर्धा, अमरावती, जालना, बीड, धुळे, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले.

राज्यात आज २४ हजार २८२ जणांचे कोरोना लसीकरण

author img

By

Published : Jan 23, 2021, 9:29 PM IST

मुंबई - राज्यात आज २९० केंद्रांवर २४ हजार २८२ (८३ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात आज सर्वात जास्त गोंदीया जिल्ह्यात १४३ टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ गडचिरोली, वर्धा, अमरावती, जालना, बीड, धुळे, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. सोमवारपासून मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. ३१ जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने ३० जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही.

आतापर्यंत एकूण ९९ हजार २४२ जणांना लस

आज सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून, काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. राज्यात आतापर्यंत एकूण ९९ हजार २४२ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात आज २९७ जणांना कोवॅक्सीन लस देण्यात आली असून, आतापर्यंत एकूण १५७२ जणांना ही लस देण्यात आली आहे.

आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी

अकोला (२५८, ८६ टक्के, ११०६), अमरावती (५७५, ११५ टक्के, २३८६), बुलढाणा (४६९, ७८ टक्के, २११७), वाशीम (२३३, ७८ टक्के, ११३१), यवतमाळ (३२९, ७३ टक्के, १७८८), औरंगाबाद (९३६, ७२ टक्के, ३१३७), हिंगोली (२०८, १०४ टक्के, ९७६), जालना (४५२, ११३ टक्के, १६८५), परभणी (१७३, ४३ टक्के, १३२२), कोल्हापूर (८४८, ७७ टक्के, ३५०४), रत्नागिरी (३४१, ६८ टक्के, १४५५), सांगली (८७१, ९७ टक्के, २७३९), सिंधुदूर्ग (२१०, ७० टक्के, ९१०), बीड (५५४, १११ टक्के, २२६२), लातूर (५९५, ९९ टक्के, २१०७), नांदेड (५२०, १०४ टक्के, १६७७), उस्मानाबाद (३०१, १०० टक्के, १३०१), मुंबई (१४८४, ९३ टक्के, ४७६६), मुंबई उपनगर (२०३३, ७० टक्के, ७३९३), भंडारा (२६३, ८८ टक्के, १२३८), चंद्रपूर ( ४७६, ७९ टक्के, २१७७), गडचिरोली (५४२, १३६ टक्के, १५७०), गोंदिया (४२८, १४३ टक्के, १२६७), नागपूर (१०५६, ८८ टक्के, ४७६७), वर्धा (७१५, ११९ टक्के, २६४५), अहमदनगर (८७०, ७३ टक्के, ३९०६), धुळे (४३५, १०९ टक्के, १८९१), जळगाव (६६४, ८६ टक्के, २५७०), नंदुरबार (३०८, ७७ टक्के, १४७५), नाशिक (७३३, ५६ टक्के, ४०३६), पुणे (१८५३, ६० टक्के, ८२५१), सातारा (७७२, ८६ टक्के, ३४७२), सोलापूर (१०८२. ९८ टक्के, ४६०३), पालघर (३१४, ७९ टक्के,१५९०), ठाणे (२२०१, ९६ टक्के, ९०४०), रायगड (१८०, ४५ टक्के, ९८२)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.