ETV Bharat / city

जीएसटी प्रणाली सोपी, दोषविरहीत करण्यासाठी केंद्रस्तरीय मंत्रिगट; अजित पवार अध्यक्ष - ajit pawar head gst ministerial panel

वस्तू व सेवा करप्रणालीतील (जीएसटी) त्रुटी दूर करून ती सहज, सोपी करण्यासंदर्भात सुधारणा सूचविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे.

ajit pawar head gst ministerial panel
जीएसटी मंत्रिगट अजित पवार
author img

By

Published : Sep 27, 2021, 10:18 PM IST

Updated : Sep 28, 2021, 2:49 PM IST

मुंबई - वस्तू व सेवा करप्रणालीतील (जीएसटी) त्रुटी दूर करून ती सहज, सोपी करण्यासंदर्भात सुधारणा सूचविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे. मंत्रिगटाने शिफारस केलेल्या आणि जीएसटी परिषदेने मंजूर केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीवर देखील हाच मंत्रिगट देखरेख ठेवणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी केले.

हेही वाचा - परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ; खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, आंध्रप्रदेशचे अर्थमंत्री बुग्गना राजेंद्रनाथ, आसामचे अर्थमंत्री अजंटा निओग, छत्तीसगडचे व्यापार करमंत्री टी.एस. सिंगदेव, ओडिशाचे अर्थमंत्री निरंजन पुजारी, तामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पलानीवेल थैगाराजन यांचा समावेश आहे.

हा मंत्रिगट सध्याची जीएसटी भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणे, करदात्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करणे, करवसुलीतील गैरप्रकार थांबवणे, माहिती - तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून करप्रणाली सक्षम, दोषविरहीत बनवणे, केंद्र व राज्यांच्या करयंत्रणेमध्ये समन्वयासाठी यंत्रणा प्रस्थापित करणे आदी विषयांसंदर्भात वेळोवेळी शिफारशी करणार आहे. मंत्रिगटाने केलेल्या व जीएसटी परिषदेने मंजूर केलेल्या शिफारशींच्या कालबद्ध अंमलबजावणीवरही हाच मंत्रिगट लक्ष ठेवणार आहे. १७ सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या ४५ व्या बैठकीनंतर हा मंत्रिगट स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंदर्भातील परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

हेही वाचा - मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

Last Updated : Sep 28, 2021, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.