ETV Bharat / city

Gsb Ganesh Seva Mandal सलग दहाव्यांदा शिस्तबध्द गणेश मंडळाचा किताब मुंबईतील प्रसिद्ध जीएसबी मंडळाला - Public Ganeshotsav Mandal

मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ famous Ganpati Mandal in Mumbai म्हणजे जीएसबी गणपती मंडळ. GSB Mandal यंदा सलग दहाव्यांदा शिस्तबध्द गणेश मंडळाचा किताब Disciplined Ganesh Mandal मुंबईतील प्रसिद्ध जीएसबी मंडळाला मिळणार आहे. मुंबईच्या माटुंगा परिसरात असणारे हे गणपती मंडळ famous GSB Mandal In Mumbai त्यांच्या शिस्तप्रिय नियोजनासाठी प्रसिद्ध आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे याच नियोजनामुळे या मंडळाला मागील दहा वर्षापासून शिस्तबद्ध मंडळाचा किताब मिळतोय.

gsb mandal
जीएसबी मंडळ
author img

By

Published : Aug 29, 2022, 9:48 AM IST

मुंबई गणपती अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत गणपती मंडळांची तयारीची लगबग सुरू आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ म्हणजे जीएसबी गणपती मंडळ. famous Ganpati Mandal in Mumbai मुंबईच्या माटुंगा परिसरात असणारे हे गणपती मंडळ त्यांच्या शिस्तप्रिय नियोजनासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईत कुठल्याही सार्वजनिक मंडळाची Public Ganeshotsav Mandal आपण साधारण माहिती घेतल्यास लक्षात येते की, तिथे रोज हजारो लोक दर्शनाला येत असतात. जीएसबी मंडळाचे देखील असेच काही आहे. मात्र, इतर ठिकाणी जशी चेंगराचेंगरी अथवा हुल्लडबाजी होते असा कोणताही प्रकार या मंडळाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत नाही. याला कारण म्हणजे या मंडळाचे नियोजन. यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे याच नियोजनामुळे या मंडळाला मागील दहा वर्षापासून शिस्तबद्ध मंडळाचा किताब मिळतोय.

3 हजारांहुन अधिक स्वयंसेवक कार्यरत या संदर्भात ईटीव्ही भारतला Etv bharat माहिती देताना मंडळाचे विश्वस्त अमित म्हणाले की, मुंबईतील काही प्रसिद्ध गणपती मंडळांपैकी एक आमचं गणेशोत्सव मंडळ आहे. इथं रोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनाला येत असतात. उत्सवाचं नियोजन करण्यासाठी आमच्याकडे काही कमिट्या आहेत. ज्या जवळपास महिनाभर आधी संपूर्ण उत्सवाचं नियोजन करतात. आमच्या बैठका होतात. या बैठकांमध्ये आमची स्ट्रॅटेजी ठरते. कसं नियोजन करायचं, कुणाला कोणती जबाबदारी द्यायची, याबाबत सर्व नियोजन आमच्या या बैठकांमध्ये होत असतं. अशा आमच्या एकूण 54 कमिट्या आहेत. या 54 कमिट्यांना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत या सर्व कमिट्यांचे मिळून एकूण साधारण तीन हजारांहुन अधिक स्वयंसेवक संपूर्ण उत्सवात त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. या स्वयंसेवकांच्या मेहनतीमुळेच मागची सलग दहा वर्ष आम्हाला मोस्ट डिसिप्लिन गणेशोत्सव हा किताब Disciplined Ganesh Mandal मिळतोय.

10 दिवसात तब्बल 20 हजार हवन मंडळाबाबत माहिती देताना अमित पुढे म्हणाले की, आमचं एकमेव मंडळ असं आहे जिथे दहा दिवस फक्त आणि फक्त पूजा पाठ चालतो. आमच्या इथे हवन केले जातात, भाविकांच्या तुला केल्या जातात, नवस बोलले जातात. दहा दिवसात आमच्या इथे जवळपास 20 हजारहून अधिक हवन भाविकांकडून केले जातात. यासोबतच दहा हजारहून अधिक तुला देवाला अर्पण होतात. तसंच रात्री दीपोत्सव होतो हे असे एकमेव मंडळ आहे ज्याच्या या सर्व उपक्रमात लाखोच्या संख्येने भाविक सहभागी झालेले असतात.

दररोज मिळतो महाप्रसाद या मंडळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शनासोबतच मोफत महाप्रसाद मिळतो. साधारणतः गणपती म्हटलं की प्रसाद म्हणून चणे फुटाणे दिले जातात. मात्र, हे मंडळ चणे फुटण्याच्या प्रसादासोबतच भाविकांना महाप्रसाद देखील देते तो देखील मोफत. त्यामुळे दरवर्षी लाखो भावीक तसंच गरजूंच्या दहा दिवस अन्नाची सोय झालेली असते. हा प्रसाद इथे येणाऱ्या भाविकांना जमिनीवर बसून केळीच्या पानांमध्ये दिला जातो. आणि त्यासाठी मंडळाचे जवळपास 1300 ते 1200 स्वयंसेवक या कामात गुंतलेले असतात.

हेही वाचा Ganeshotsav 2022 मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन यात्रा, राज्याच्या पर्यटन विभागाचा नवा उपक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.