ETV Bharat / city

'महाराष्ट्र दिन विशेष' ; 1938 ते 1960...जाणून घ्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास! - 1st may

आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा दिवस. मराठी भाषिक राज्याच्या मागणीसाठी सुरू झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, त्यासाठी केलेला संघर्ष तसेच चर्चेत राहिलेल्या निर्णयांचा घटनाक्रम...

महाराष्ट्र दिवस
जाणून घ्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास!
author img

By

Published : May 1, 2020, 4:58 PM IST

आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा दिवस. मराठी भाषिक राज्याच्या मागणीसाठी सुरू झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, त्यासाठी केलेला संघर्ष तसेच चर्चेत राहिलेल्या निर्णयांचा घटनाक्रम...

१५ ऑक्टोबर १९३८ - मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदा मराठी भाषिक राज्याचा ठराव मांडण्यात आला.

१९४६ - साहित्य संमेलनात गं.त्र्य. माडखोलकर अध्यक्ष असताना संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. यावेळी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मराठी राज्याची मागणी लावून धरली

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषिक राज्यासाठी संघटित प्रयत्न करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना...परिषदेचे कार्यकर्ते - द. कृ. सोवनी, गं.त्र्य. माडखोलकर, श्री. दा. मगरे तर, पुरस्कर्ते - न.वि. गाडगीळ

१९४८ - भाषावार प्रांतरचनेसाठी न्यायमूर्ती एस.के.धर कमिशन नियुक्त

एप्रिल १९४९ - जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारमय्या यांच्या जेव्हीपी समितीचे गठन

डिसेंबर १९५३ - केंद्र सरकारकडून फझल अली कमिशनची नेमणूक...न्यायमूर्ती फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पूनर्रचना आयोगाची स्थापना

८ नोव्हेंबर १९५५ - केंद्र सरकारचा मुंबई, महाराष्ट्र, गुजरात असा तीन राज्यांचा प्रस्ताव, यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट

१८ नोव्हेंबर १९५५ - चर्चगेटवर त्रिराज्याविरोधी मोर्चा - पाचशे लोकांचा जमाव उपस्थित

२० नोव्हेंबर १९५५ - गिरगाव चौपाटीवर मोरारजी देसाई आणि स.का. पाटील यांची सभा जमावाने उधळली

२१ नोव्हेंबर १९५५ - सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली. तसेच विधी मंडळावर मोर्चा. गिरण्या, कारखाने, गोद्या बंद केल्या; साडेचार लाख कामगारांचा सहभाग....त्रिराज्य योजना मोडून काढण्यासाठी सेनापती बापटांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा फाऊंटन जवळ आल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रूधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. गोळीबार झाला. पहिल्या पंधरा जणांचा मृत्यू ३०० जखमी; आंदोलनाला खऱ्या अर्थाने हिंसक वळण

१५ जानेवारी १९५६ - पंतप्रधान नेहरूंचे ऑल इंडिया रेडियोवरून निवेदन, विदर्भासह महाराष्ट्र आणि कच्छसह गुजरात आशी दोन स्वतंत्र राज्ये; तर मुंबई केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा; आणि महाराष्ट्रातील ठिणगीच रुपांतर वणव्यात

१६ जानेवारी १९५६ - मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; नाईट स्कूल मधून येणारा बंडू गोखले विद्यार्थी मारला गेला; दुसऱ्या दिवशी जनतेने उस्फूर्त बंद पाळला. चळवळीच्या नेत्यांचे अटकसत्र सुरू झाले. संचारबंदी लागू करण्यात आली. कॉम्रेड डांगे आणि सेनापती बापट आधीच गजाआड होते.

१६ जाने ते २३ जाने - या सात दिवसांत ४४२ वेळा गोळीबार; ९० मृत्यू तर ४०० हून अधिक जखमी शंकरराव देवांची ऐनवेळी चळवळीतून माघार.. यानंतर एस.एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीचा उदय; मुंबईचे पडसाद दिल्लीत उमटले....अर्थमंत्री चिंतामणराव देशमुखांचा लोकसभेत राजीनामा

२७ जुलै १९५६ - २००० मराठा भूमिपूत्रांची थेट संसदेवर धडक

ऑक्टोबर १९५६ - द्विभाषिक राज्य लादण्याचा प्रयत्न - मुंबईसह महाराष्ट्र आणि सौराष्ट्र-कच्छसह गुजरात या द्विभाषिक राज्याला मुंबई राज्य असे नाव देण्यात आले.

मार्च १९५७ - विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव; संयुक्त महाराष्ट्र समितीचा मोठा विजय

३० नोव्हेंबर १९५७ - प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण सोहळा पंडीत नेहरूंच्या हस्ते पर पडणार होता. पण यावेळी आण्णाभाऊ साठे, क्रांतीसिंह नाना पाटील, आचार्य अत्रे, एस.एम. जोशी, कॉम्रेड डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, कॉम्रेड मिरजकर, दादासाहेब गायकवाड, गुलाबराव गणाचार्य सर्वजणांनी काळे झेंडे घेऊन विरोध दर्शवला....नेहरू माघारी परतले

८ मार्च १९६० - मुंबईसह महाराष्ट्र राज्य संमत; द्विभाषिक राज्याचा शेवट

३० एप्रिल १९६० - रात्री दहा वाजता हजारोंच्या संख्येने लोकांची मुंबईत मशाल मिरवणूक; रात्री बारा वाजता १०६ हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली

१ मे १९६० - बेळगाव कारवार हे म्हैसूर राज्यात आणि अन्य २०८ गावे महाराष्ट्रात सामील; तर ५० कोटी गुजरातला देण्यात आले

१ मे १९६० - मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य साकार....मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.