ETV Bharat / city

राणीबागेत २० वर्षांनी घुमणार वाघ, सिंहाची डरकाळी

आता लवकरच पर्यटकांना वाघ, सिंह पाहता येणार असून त्यांच्या डरकाळ्याही ऐकू येणार आहेत. राणीबागेत या महिन्याच्या अखेरीस गुजरातवरून दोन सिंह तर, औरंगाबादवरून दोन वाघ आणले जाणार आहेत.

ranibagh mumbai
राणीबागेत २० वर्षांनी घुमणार वाघ, सिंहाची डरकाळी
author img

By

Published : Feb 3, 2020, 2:02 AM IST

मुंबई - भायखळा येथील राणीबागेत वाघ, सिंह दिसत नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जायची. एकेकाळी याच राणीबागेत वाघ आणि सिंहाची डरकाळी ऐकू यायची, आता इथे काही नाही, असा सूर पर्यटकांमधून उमटत असे. मात्र, आता लवकरच पर्यटकांना वाघ, सिंह पाहता येणार असून त्यांच्या डरकाळ्याही ऐकू येणार आहेत. राणीबागेत या महिन्याच्या अखेरीस गुजरातवरून दोन सिंह तर, औरंगाबादवरून दोन वाघ आणले जाणार आहेत.

राणीबागेत २० वर्षांनी घुमणार वाघ, सिंहाची डरकाळी

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीबागेला पर्यटक हजारोंच्या संख्येने भेट देतात. काही वर्षांपूर्वी प्राण्यांचा मृत्यू झाल्याने राणीबाग आणि पालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. प्राणीप्रेमी संघटनांनी निदर्शनेही केली. या दरम्यान राणीबाग आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्राण्यांना त्रास होणार नाही, त्यांना आपण निसर्गाच्या सहवासात आहोत असे पिंजरे बनवण्याचे काम सुरू आहे. पर्यटकांना प्राणी पाहता यावेत म्हणून या पिंजऱ्याना काचा लावण्यात आल्या आहेत.

राणीबागेत गेले काही वर्षे पुनर्विकासाचे काम सुरू आहे. दीड वर्षांपूर्वी राणीबागेत हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यानंतर पर्यटकांची संख्या वाढू लागली. त्यामुळे राणीबाग प्रशासनाने देशी विदेशी प्राणी आणि पक्षी आणण्यासाठी विविध प्राणिसंग्रहालयांशी पत्रव्यवहार केला आहे. राणीबाग प्राणिसंग्रहालयाने सिंहांच्या जोडीसाठी गुजरातच्या सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला आणि वाघाच्या जोडीकरीता औरंगाबाद पालिका प्राणिसंग्रहालयाला पाठवलेले प्रस्ताव मान्य झाले आहेत. राणीबागेच्या नुतनीकरणाच्या कामात आठ नवीन पिंजरे उभारले जात आहेत. त्यापैकी तीन पिंजऱ्यांचे काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याच्या मार्गावर असून ते पूर्ण झाल्यानंतर वाघ, सिंह मुंबईत आणण्याची तयारी पालिकेने केली आहे.

वीस वर्षांनी वाघ, सिंह पाहायला मिळणार -

राणीबागेत अनिता आणि जिमी अशा दोन सिहिंणीचा तसेच एका वाघाचा वीस वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर राणीबागेत वाघ, सिंहाचे दर्शन झाले नाही, त्यांची डरकाळीही ऐकू आलेली नाही. आता गुजरातवरून दोन सिंह आणि औरंगाबादवरून दोन वाघ आणले जाणार असल्याने राणीबागेत तब्बल २० वर्षांनी वाघ आणि सिंहाची डरकाळी ऐकू येणार आहे.

हे प्राणी आणले जाणार -

नुकतीच राणीबागेत बारशिंगा, तरस, बिबट्या, अस्वल हे प्राणी आणण्यात आले आहेत. या महिन्याच्या अखेर पर्यंत वाघ-सिंह आणि वाघ आणला जाणार आहे. त्यासोबत १० काळविटे, बारशिंग्यांच्या तीन जोड्या, नर-मादी पाणघोडा, तीन कोल्हे, तीन लांडगे आणले जाणार आहेत. कानपूर प्राणिसंग्रहालयातून काळविटाच्या जोड्या, लखनऊ प्राणिसंग्रहालयातून बारशिंगे, सुरत प्राणिसंग्रहालयातून कोल्हे, कानपूर प्राणिसंग्रहालयातून पाणघोडे आणि जोधपूर पाणघोडे लांडग्यांची जोडी आणली जाणार आहे.

नॅशनल पार्क ऐवजी राणीबागेत सिंह -

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (नॅशनल पार्क) प्रशासनाने लायन सफारीसाठी सक्करबाग प्राणिसंग्रहालयाकडे सिंहांची मागणी केली होती. त्याला सक्करबाग प्राणिसंग्रहालयाने नकार दिला आहे. नॅशनल पार्कला ऐवजी राणीबागेला सिंहांची जोडी देण्यासाठी मान्यता दिली आहे. त्या बदल्यात राणीबाग कोणता प्राणी देणार हे निश्चित झालेले नाही. सर्व प्रकारचे प्राणी आणण्यास राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे

Intro:मुंबई - भायखळा येथील राणीबागेत वाघ सिंह दिसत नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जायची. एकेकाळी याच राणीबागेत वाघ आणि सिंहाची डरकाळी ऐकू यायची, आता इथे काही नाही अशी टिका पर्यटकांकडून केली जात होती. मात्र आता लवकरच पर्यटकांना वाघ सिंह पाहता येणार असून त्यांच्या डरकाळ्याही ऐकू येणार आहेत. राणीबागेत या महिन्याच्या अखेरीस गुजरातवरून दोन सिंह तर औरंगाबादवरून दोन वाघ आणले जाणार आहेत. Body:भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीबागेला पर्यटक हजारोंच्या संख्येने भेट देतात. काही वर्षांपूर्वी प्राण्यांचा मृत्यू झाल्याने राणीबाग आणि पालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. प्राणी प्रेमी संघटनांनी निदर्शनेही केली. या दरम्यान राणीबाग आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्राण्यांना त्रास होणार नाही, त्यांना आपण निसर्गाच्या सहवासात आहोत असे पिंजरे बनवण्याचे काम सुरू आहे. पर्यटकांना प्राणी पाहता यावेत म्हणून या पिंजऱ्याना काचा लावण्यात आल्या आहेत.

राणीबागेत गेले काही वर्षे पुनर्विकासाचे काम सुरू आहे. दिड वर्षांपूर्वी राणीबागेत हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यानंतर पर्यटकांची संख्या वाढू लागली. त्यामुळे राणीबाग प्रशासनाने देशी विदेशी प्राणी आणि पक्षी आणण्यासाठी विविध प्राणिसंग्रहालयांशी पत्रव्यवहार केला आहे. राणीबाग प्राणिसंग्रहालयाने सिंहांच्या जोडीसाठी गुजरातच्या सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला आणि वाघाच्या जोडीकरीता औरंगाबाद पालिका प्राणिसंग्रहालयाला पाठविलेले प्रस्ताव मान्य झाले आहेत. राणीबागेच्या नुतनीकरणाच्या कामात आठ नवीन पिंजरे उभारले जात आहेत. त्यापैकी तीन पिंजऱ्यांचे काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याच्या मार्गावर असून ते पूर्ण झाल्यानंतर वाघ, सिंह मुंबईत आणण्याची तयारी पालिकेने केली आहे.

वीस वर्षांनी वाघ सिंह पहायला मिळणार -
राणीबागेत अनिता आणि जिमी अशा दोन सिहिंणीचा तसेच एका वाघाचा वीस वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर राणीबागेत वाघ सिंहाचे दर्शन झाले नाही, त्यांची डरकाळीही ऐकू आलेली नाही. आता गुजरातवरून दोन सिंह आणि औरंगाबादवरून दोन वाघ आणले जाणार असल्याने राणीबागेत तब्बल २० वर्षांनी वाघ आणि सिंहाची डरकाळी ऐकू येणार आहे.

हे प्राणी आणले जाणार -
नुकतीच राणीबागेत बारशिंगा, तरस, बिबट्या, अस्वल हे प्राणी आणण्यात आले आहेत. या महिन्याच्या अखेर पर्यंत वाघ-सिंह आणि वाघ आणला जाणार आहे. त्यासोबत १० काळविटे, बारशिंग्यांच्या तीन जोड्या, नर-मादी पाणघोडा, तीन कोल्हे, तीन लांडगे आणले जाणार आहेत. कानपूर प्राणिसंग्रहालयातून काळविटाच्या जोड्या, लखनऊ प्राणिसंग्रहालयातून बारशिंगे, सुरत प्राणिसंग्रहालयातून कोल्हे, कानपूर प्राणिसंग्रहालयातून पाणघोडे आणि जोधपूर पाणघोडे लांडग्यांची जोडी आणली जाणार आहे.

नॅशनल पार्क ऐवजी राणीबागेत सिंह -
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (नॅशनल पार्क) प्रशासनाने लायन सफारीसाठी सक्करबाग प्राणिसंग्रहालयाकडे सिंहांची मागणी केली होती. त्याला सक्करबाग प्राणिसंग्रहालयाने नकार दिला आहे. नॅशनल पार्कला ऐवजी राणीबागेला सिंहांची जोडी देण्यासाठी मान्यता दिली आहे. त्या बदल्यात राणीबाग कोणता प्राणी देणार हे निश्चित झालेले नाही. सर्व प्रकारचे प्राणी आणण्यास राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे

बातमीसाठी vivo pkgConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.