ETV Bharat / city

ऐतिहासिक वारसा जपत 'हे' तीन रेल्वे स्थानक होणार आधुनिक; वाचा सविस्तर - Three railway stations will be moder

देशाच्या तीन ऐतिहासिक रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी भारत सरकारने आज बुधवार (दि. 28 सप्टेंबर)रोजी 60 हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. यामध्ये देशातील महत्त्वाचे छत्रपती शिवाजी टर्मिनस अहमदाबाद आणि दिल्ली हे रेल्वे स्थानक विकसित केले जाणार आहेत.

रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानक
author img

By

Published : Sep 28, 2022, 5:53 PM IST

मुंबई - देशातील एकूण 199 रेल्वे स्थानक यांना आधुनिकीकरणाची जोड देण्यासाठी भारत सरकारने प्रस्ताव तयार केला आहे. त्यामध्ये ही महत्त्वाची तीन ऐतिहासिक रेल्वे स्थानक असणार आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. रेल्वेचा फलाट या ठिकाणी बरीच मोकळी जागा आहे. ही मोकळी जागा स्थानिक उत्पादनांसाठी त्यांच्या रोजगाराला चालना देण्यासाठी वापरली जाणार आहे. तसेच, आपले बहुतांशी रेल्वे स्थानक हे जुन्या पद्धतीचे आहेत. त्यातला ऐतिहासिक वारसा जपत नवीन आणि आधुनिक पद्धतीने यामध्ये आपण बदल करणार आहोत अशी माहिती त्यांनी बोलताना दिली आहे.

आरोग्याच्या दृष्टीने सोयीचे असेल - आरोग्याच्या दृष्टीने सोयीचे असेलज्या शहरात रेल्वे स्थानक आहेत ते शहरातील वास्तू आणि रेल्वेतील वास्तू यांची एकात्मिक बांधणी दिसली पाहिजे. वायुवीजन नेमके कसे असेल पाहिजे, जेणेकरून हवा खेळती राहील. जनेतला आरोग्याच्या दृष्टीने सोयीचे असेल. दरम्यान, त्यामध्ये अत्याधुनिकता देखील असली पाहिजे असा विचार केला आहे. असही वैष्णव यांनी याप्रसंगी सांगितले आहे.

आधुनिकीकरणाचे वैशिट्य - मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जागतिक पर्यटन स्थळ देखील असल्याच त्यांनी सांगितलं. त्यामुळे याच्या ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या आजूबाजूचा जो परिसर आहे. त्या परिसराचा विकास आधुनिक पद्धतीने केला जाणार आहे जेणेकरून अफाट लोकसंख्या जी रोज छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा उपनगराच्या रेल्वे स्थानकांवर येते, त्यांना येण्या-जाण्यासाठी सोयीचं होईल. या रीतीने रेल्वे स्थानकाचा विकास केला जाणार आहे. तसेच, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन, देशी आणि अत्याधुनिक वास्तुरचना केल्या जातील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.