ETV Bharat / city

आरे कॉलनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या घरातून मिळाले तीन कोटी

author img

By

Published : May 25, 2021, 6:06 PM IST

या प्रकरणातील तक्रारदार यांचे आरे कॉलनी गोरेगाव पूर्व येथे घर असून या घराच्या दुरुस्तीची परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांनी परवानगी देण्याच्या संदर्भात अरविंद तिवारी या शिपायास भेटण्यास सांगितले होते.

Aarey Chief Executive Officer
Aarey Chief Executive Officer

मुंबई - आरे कॉलनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यास लाचलुचपत विभागाने तब्बल 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक केलेली आहे.

'50 हजार रुपये द्यावे लागतील'

या प्रकरणातील तक्रारदार यांचे आरे कॉलनी गोरेगाव पूर्व येथे घर असून या घराच्या दुरुस्तीची परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांनी परवानगी देण्याच्या संदर्भात अरविंद तिवारी या शिपायास भेटण्यास सांगितले होते. तक्रारदाराने अरविंद तिवारी या शिपायाची भेट घेतली असता या कामासाठी नथू राठोड यास 50 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आलेली होती.

सापळा रचण्यात आल्यानंतर अटक

लाचलुचपत विभागाकडून यासंदर्भात सापळा रचण्यात आल्यानंतर आरोपी अरविंद तिवारी यास 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती व त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी नथू राठोड याच्यासमोर त्यास हजर केले असता या दोघांनी त्यांचा गुन्हा कबूल केलेला आहे. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता नथू राठोड याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून तब्बल 3 कोटी 46 लाख 10 हजार एवढी बेहिशोबी रक्कम मिळून आलेली आहे. यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.