मुंबई - मुंबईतील प्रसिद्ध झवेरी बाजारात दरोडा टाकण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या तिघांना मुंबई एलटी मार्ग पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून 3 देशी बनावटीची पिस्तुले जप्त करण्यात आले आहे. यामुळे दरोडेखोरांचा डाव पोलिसांनी उध्वस्त केला आहे.
एलटी मार्ग पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजेश बीघ्दू राय (वय 34 वर्षे), सोनू उर्फ अमित बन्नु चौधरी ( वय 23 वर्षे), संजय पाचकडी दत्ता (वय 33 वर्षे) या तिघांनाही अटक करण्यात आली असून पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांच्याविरोधात मुंबई, दिल्ली याठिकाणी जबरी चोरी, दरोडा यासारखे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडीत देण्यात आली आहे.
झवेरी बाजार, दागिना बाजार या परिसरात राजेश नावाचा व्यक्ती त्याच्या साथीदारांसोबत दरोडा टाकण्याचा तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलटी मार्ग पोलिसांकडून परिसरात रेकी केलेली असून 2 ते 3 दिवसांत दरोडा टाकून सोन किंवा पैसे लुटणार आहे. संशयित व्यक्तीकडे घातक अग्निशस्त्र असून त्याचा वापर होऊ शकतो. पोलिसांकडून राजेश नावाच्या व्यक्तीची सर्व माहिती काढण्यात आली 26 मे रोजी सर्व दरोडेखोर भेटणार असल्याची माहिती एलटी मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील झवेरी बाजार, मुंबई येथे दरोडा घालण्यासाठी 7 ते 8 व्यक्ती येणार असून त्याची पूर्वतयारी करण्यासाठी ते सर्वजण मरीन लाईन्स रेल्वे स्टेशन समोर म.का. पाटील उद्यान परिसरात भेटणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - Ola Driver arrested : मुंबईत ओला टॅक्सी ड्रायव्हरला अटक; अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग